VBA News : वंचित'ने EVM वर फोडले पराभवाचे खापर, उचलले मोठे पाऊल

Prakash Ambedkar VBA EVM : प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या वेळी वंचित बहूजन आघाडी खाते उघडेल असे आम्हाला वाटत होते.
Prakash Ambedkar VBA
Prakash Ambedkar VBASarkarnama
Published on
Updated on

VBA News : महायुतीला मिळालेल्या ग्रँड यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या पराभवाचे खापर EVM वर फोडण्यात आले होते. मनसेने देखील EVM मध्ये घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता वंचित बहूजन आघाडीने देखील आपल्या पराभवासाठी EVM जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा आहे. या वेळी वंचित बहूजन आघाडी खाते उघडेल असे आम्हाला वाटत होते. मात्र, ईव्हीएममुळे खाते उघडले नाही. घोटाळा झाला आहे आणि ईव्हीएम नको म्हणून आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरू करणार आहोत.

Prakash Ambedkar VBA
Assembly Election Result : मराठवाड्यातील बडे नेते भुईसपाट; 'मविआ'च्या पडझडीत ठाकरेंच्या 'या' पठ्ठ्याने राखला गड

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.30) पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

'वंचित'चे 194 जागांवर डिपाॅझिट जप्त

वंचितने उमेदवारी दिलेल्या 200 पैकी 194 जागांवर त्यांच्या उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. वंचितमुळे महाविकास आघाडीच्या 20 उमेदवारांना फटका बसला. वंचितला विधानसभा निवडणुकीत 3.1 टक्के मते आहेत. वंचितला एकुण 14 लाख 22 हजार मते मिळाली आहेत.वंचितचा एक उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर, तब्बल 58 उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत.

Prakash Ambedkar VBA
Manoj Jarange Patil : निवडणुकीत उतरलो असतो तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com