Prakash Mahajan : शिंदे सेनेत गेलेल्या प्रकाश महाजनांकडून भाजप विषयी मोठा 'गौप्यस्फोट'

Prakash Mahajan joins Shinde Sena : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रकाश महाजनांनी भाजपबाबत मोठा खुलासा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली.
Prakash Mahajan : शिंदे सेनेत गेलेल्या प्रकाश महाजनांकडून भाजप विषयी मोठा 'गौप्यस्फोट'
Published on
Updated on

Prakash Mahajan political statement : “मी भाजपमध्ये का गेलो नाही?” या प्रश्नावर प्रकाश महाजन यांनी केलेला खुलासा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मनसेला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, या निर्णयामागची भूमिका त्यांनी एका विशेष मुलाखतीत मोकळेपणाने मांडली आहे. भाजपमध्ये प्रवेश का झाला नाही, यावर बोलताना त्यांनी ‘एन्ट्रन्स एक्झाम’चे उदाहरण देत सूचक आणि खोचक भाष्य केले.

प्रकाश महाजन म्हणाले की, माणसाचं वय वाढलं तरी त्याला समजावून सांगणारा, रुसवा काढणारा कोणी तरी असावा, हीच माणुसकी आहे. एका मित्राने माझ्यासाठी प्रयत्न केला, भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत जाऊन “प्रकाश महाजन यांना पक्षात घ्या” असंही सांगितलं. मात्र मी नेमकं कोणासमोर ही गोष्ट मांडली गेली, ते सांगणार नाही. त्या प्रयत्नानंतर मी तब्बल तीन महिने वाट पाहत राहिलो. शेवटी हे लक्षात आलं की काहीच घडणार नाही. या वयात माणसाला एका आधाराची गरज असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आधार म्हणजे केवळ आर्थिक मदत असा अर्थ कोणी काढू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आधार हा भावनिक असतो. मी महाजन आहे, तांब्याभर पाणी पिऊन झोपू शकतो. गरज पडली तर मित्रांकडून पैसे मागू शकतो, पण पैशासाठी कधीच इमान विकू शकत नाही. म्हणूनच दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर निष्ठा विकली, असं कोणी म्हणू नये. मला असा पक्ष हवा होता, जिथे हिंदुत्वाबाबत विचार जुळतील.

Prakash Mahajan : शिंदे सेनेत गेलेल्या प्रकाश महाजनांकडून भाजप विषयी मोठा 'गौप्यस्फोट'
Nagpur NCP News : नागपूरमध्ये युती आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम! राष्ट्रवादीकडून थेट 'एबी फॉर्म'चे वाटप सुरू; आता 'पॉवर' गेम रंगणार!

याच शोधात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. रात्री साडेबारा वाजता आमची भेट झाली. शिंदे साहेबांनी अत्यंत साध्या आणि स्पष्ट शब्दांत मला सांगितलं की, तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल सुरू ठेवा, तुमचं मत मोकळेपणाने मांडा. फक्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची विचारधारा जपा आणि बोलताना सभ्य भाषा वापरा. हा कानमंत्र मला महत्त्वाचा वाटला, असं महाजन म्हणाले.

Prakash Mahajan : शिंदे सेनेत गेलेल्या प्रकाश महाजनांकडून भाजप विषयी मोठा 'गौप्यस्फोट'
BJP News : जालन्यात घोळ वाढला, युती नको म्हणत कैलास गोरंट्याल समर्थक आक्रमक; राजीनामे, आत्मदहनाचाही इशारा!

राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भावनिक पण थेट भूमिका घेतली. एकेकाळी ज्यांना आपण विठ्ठल मानलं, तो विठ्ठल आता संपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मनसेपासून दूर जाण्याचा निर्णय सोपा नव्हता, पण परिस्थिती आणि अनुभवांनी तो घ्यावा लागला, असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com