Nagpur NCP News : नागपूरमध्ये युती आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम! राष्ट्रवादीकडून थेट 'एबी फॉर्म'चे वाटप सुरू; आता 'पॉवर' गेम रंगणार!

Nagpur NCP latest political news : नागपुरात राष्ट्रवादीकडून थेट एबी फॉर्मचे वाटप सुरू झाल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम, आता सत्तासंघर्ष रंगणार.
Nagpur NCP News
Nagpur NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur NCP News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता युती आणि आघाडीच्या सर्व चर्चा बंद करून एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे. हे बघता राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर शहरातील 90 जागांवर राष्ट्रवादी उमेदवार उभे करणार आहे. त्यांना आता भाजप, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दोन्ही सेनेसोबत मुकाबला करावा लागणार आहे.

राष्ट्रवादीची भाजपसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू होती. राष्ट्रवादी 15 टक्के जागा देण्याची मागणी केली होती. तसा प्रस्ताव भाजपच्या नेत्यांना दिला होता. चार दिवसांपूर्वी नागपूरचे निरीक्षक माजी आमदार राजू जैन यांनी युती होणारच असे ठामपणे सांगितले होते. नागपूरचे नेते काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका, जागा वाटपाची बोलणी अजित दादा करणार आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा असा सल्लाही देण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने सन्मानजनक जागा देण्याची मागणी केली होती. मात्र भाजपने चार ते पाचच जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात येते.

Nagpur NCP News
Ajit Pawar’s NCP Politics : नागपुरात महायुतीचं गणित बिघडलं? अजितदादांनी AB फॉर्मही वाटले, आघाडीनेही बाजी मारली

भाजपचा हा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावला आहे. त्यापेक्षा आपल्या बळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिली आहे. हे बघून आता युती आणि आघाडीच्या चर्चा बंद करून निवडणूक रिंगणात आपले कार्यकर्ते उतरवल्या जाणार आहे.

सोमवारी दुपारपर्यंत सुमारे 60 इच्छुकांना पक्षाच्यावतीने एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीकडे आभा पांडे, तानाजी वनवे, राजेश माटे हे माजी नगरसेवक आहेत. या सर्वांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. आभा पांडे या मागील निवडणुकीत अपक्ष तर तानाजी वनवे हे काँग्रेसमधून निवडून आले होते. वनवे यांच्याच प्रचारसभेत मोठा राडा झाला होता.

Nagpur NCP News
BJP News : जालन्यात घोळ वाढला, युती नको म्हणत कैलास गोरंट्याल समर्थक आक्रमक; राजीनामे, आत्मदहनाचाही इशारा!

तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतीश अशोक चव्हाण यांच्यावर अंडी व शाई फेकण्यात आली होती. त्यानंतरही वनवे निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यासोबत त्यांचे खटकले. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर वनवे यांनी राष्ट्रवादी चा पर्याय निवडला. आता त्यांना भाजप, काँग्रेस या बलाढ्य पक्षासोबत दोन हात करावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com