Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, फॉरेन्सिक रिपोर्टमुळे मिळणार 'त्या' आरोपातून क्लिनचिट?

Pranjal Khewalkar forensic report : पुण्यातील खराडी परिसरात झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
pranjal khewalkar
pranjal khewalkar Sarkarnama
Published on
Updated on

पुण्यातील खराडी परिसरात झालेल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणीत प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे.

27 जुलै रोजी पुणे पोलिसांनी खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या पार्टीवर छापा टाकला होता. त्या वेळी पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले आणि प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली होती. तसेच 25 जुलैलाही त्याच ठिकाणी पार्टी झाल्याचा पोलिसांचा दावा होता. खेवलकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले, परंतु याबाबत ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांना जामीन मिळाला होता. मात्र आता त्यांच्या फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणात नवे वळण आलं आहे.

पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्व आरोपींचे रक्त नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. त्याचा अहवाल आता पोलिसांना मिळाला असून, त्यात प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पोलिसांनी हा अहवाल चार्जशीटमध्ये देखील समाविष्ट केला असून तो न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

pranjal khewalkar
RSS centenary : नेहरूंमुळं RSS ला ‘तो’ मान मिळाला, आज तेच टपाल तिकीटावर आलं..! पंतप्रधान मोदींचेही गौरवोद्गार

काय आहे नेमकं प्रकरण?

27 जुलै रोजी खराडीतील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांना काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले. त्यावेळी प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक करण्यात आली. काही महिलादेखील त्या पार्टीत उपस्थित होत्या. पोलिसांचा दावा होता की या पार्टीदरम्यान अंमली पदार्थांचं सेवन झालं आहे. त्याच आधारावर आरोपींवर कारवाई करण्यात आली.

pranjal khewalkar
Crop Inspection : प्रत्येक गावात होणार 100% पीक पाहणी; बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

दरम्यान, आरोपींना अंमली पदार्थ सेवनाचा ठोस पुरावा मिळाला नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगवासानंतर जामीन मंजूर केला होता. आता मिळालेल्या फॉरेन्सिक अहवालातही ड्रग्सचं सेवन झालं नसल्याचं समोर आल्याने आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com