RSS centenary : नेहरूंमुळं RSS ला ‘तो’ मान मिळाला, आज तेच टपाल तिकीटावर आलं..! पंतप्रधान मोदींचेही गौरवोद्गार

RSS Volunteers’ March on Rajpath : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारतीय चलनावर भारत माता दिसत आहे, हे बहुतेक पहिल्यांदाच होत असावे. नाण्यावर संघाचे बोधवाक्यही आहे.
"Prime Minister Narendra Modi releases a special postal stamp on RSS centenary, recalling Jawaharlal Nehru’s invitation for RSS march at Rajpath."
"Prime Minister Narendra Modi releases a special postal stamp on RSS centenary, recalling Jawaharlal Nehru’s invitation for RSS march at Rajpath."Sarkarnama
Published on
Updated on

RSS Centenary Celebration and Historical Significance : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज दिल्लीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते एक विशेष टपाल तिकीट आणि एका विशेष नाणं जारी करण्यात आलं. या दोन्ही गोष्टी खास आहेत. पंतप्रधानांनीही त्याविषयी गौरवोद्गार काढले.

ऐतिहासिक टपाल तिकीट

आज जारी करण्यात आलेले टपाल तिकीट ऐतिहासिक आहे. त्याचे थेट कनेक्शन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी आहे. 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आरएसएसच्या स्वयंसेवकांनी राजपथावर संचलन केले होते. हा राजपथ आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जातो. मोदी सरकारने हे नामकरण देले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आरएसएसला हा मान दिला होता.

1962 च्या भारत-चीन युध्दादरम्यान आरएसएसच्या स्वयंसेवकांनी केलेली कामगिरी नेहरूंना भावली होती. त्यानंतर नेहरूंनीच राजपथावर संचलनासाठी आरएसएसला संधी दिली होती. स्वयंसेवकांसाठी हा क्षण ऐतिहासिक असाच होता. त्याच क्षणाची आठवण टपाल तिकीटावर कोरण्यात आली आहे. संचलनाच्या फोटोसह सेवा कार्याचा फोटो या तिकीटावर आहे.

"Prime Minister Narendra Modi releases a special postal stamp on RSS centenary, recalling Jawaharlal Nehru’s invitation for RSS march at Rajpath."
Anil Joshi News : राहुल गांधींची रणनीती, भाजपचे माजी मंत्री अनिल जोशी काँग्रेसच्या वाटेवर; कृषी कायद्यांना केला होता कडाडून विरोध...

विशेष नाण्याचे महत्व

पंतप्रधान मोदींनी जारी केलेले नाणंही खास आहे. या नाण्यावर एका बाजूला ‘भारत माता’ आणि आरएसएस स्वयंसेवकांची पारंपरिक सलामी देणारी मुद्रा दिसते. आरएसएसच्या कार्यक्रमांमध्येही स्वयंसेवकांची हीच मुद्रा दिसून येते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभ आहे आणि नाण्याचे मूल्य दिसते. हे नाणं चांदीचं असून त्याचे मूल्य 100 रुपये एवढे आहे.   

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारतीय चलनावर भारत माता दिसत आहे, हे बहुतेक पहिल्यांदाच होत असावे. नाण्यावर संघाचे बोधवाक्यही आहे. भारत माता आणि समोर संघाचे स्वंयसेवक समर्पित भावनेने नमन करत असल्याचे दिसत आहे. टपाल तिकीटावर ऐतिहासिक क्षणाची आठवण जागृत करण्यात आली आहे. सातत्याने देशाची सेवा करणारे आणि समाजाला सशक्त बनविणारे स्वंसेवकही त्यावर दिसत असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले.

"Prime Minister Narendra Modi releases a special postal stamp on RSS centenary, recalling Jawaharlal Nehru’s invitation for RSS march at Rajpath."
BJP Politics : भाजपचा 10 वर्षांचा विजयाचा रेकॉर्ड मोडला; आक्रमक मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का....

संघाला रोखण्याचे अनेक प्रयत्न झाल्याचे सांगत मोदी म्हणाले, गुरूजींना खोट्या प्रकरणांमध्ये जेलमध्ये टाकण्यात आले. पण संघानेही कधीही कटुता ठेवली नाही. संघाचे स्वयंसेवक समाजापासून वेगळे नाहीत. ते समाजाचाच एक भाग आहेत. त्यांनी नेहमीच लोकशाही घटनात्मक संस्थांवरील विश्वास कायम ठेवला. अनेक आव्हानांनंतरही संघ आज विशाल वटवृक्षाप्रमाणे उभा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com