Pravin Darekar : जयंत पाटलांची अडचण वाढणार? शिवाजी महाराजांवरील 'त्या' वक्तव्यावर भाजप आक्रमक

Pravin darekar On Jayant Patil : महाविकास आघाडीला खंडणी मागायची आणि वसुली करायची सवय लागली आहे. जयंत पाटलांनी शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

Pravin darekar News : शिवाजी महाराज लुटारू नव्हते. माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, असे म्हणणार नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, असे म्हणा. असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नसल्याचा आपल्या वक्तव्याच्या समर्थन एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

फडणवीसांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले. मात्र, त्यांच्या या उत्तराने भाजप आक्रमक झाले आहे. जयंत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणीच भाजप नेत्यांनी केली आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, 'महाविकास आघाडीला खंडणी मागायची आणि वसुली करायची सवय लागली आहे. म्हणूनच जयंत पाटलांनी शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली अशी मुक्तफळ उधळली. त्यांना लाज कशी वाटत नाही. शिवाजी महाराजांविषयी अशी मुक्तफळं उधळायला. माझी आग्रहाची मागणी आहे त्यांनी शिवप्रेमींची माफी मागावी.'

Jayant Patil
MVA News : 'मविआ'त जागावाटपावरून मतभेद; काही मतदारसंघावरून होणार वाद, 'या' बड्या नेत्याने दिली कबुली

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

शिवाजी महाराजांना संपत्ती वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती. सुरत लुटली ही स्वराज्य वाढवण्यासाठी लुटली. सुरती लुटली असं बोलले तर अमित शाह विचारतील. आप कैसे ये बोल रहे है, त्यामुळे ते शब्दछळ करत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

लुटली म्हणजे लुटारू नाही. नादीरशाहने सरसकट लूट केली होती. तसं महाराजांनी केलं नाही. महाराजांनी यादी तयार केली. पारेख म्हणून कुटुंब होतं. त्याच्या घरात मृत्यू झाला होता. महाराजांनी त्यावर फुली मारली. तिथे जाऊ नका म्हणून सांगितलं. त्यांनी सूरतला नोटीस पाठवली आणि खंडणी मागितली. त्यांनी सुरत लुटली. लुटले म्हणजे लुटारू नाही. लुटारू घरे भरणारे असतात.

Jayant Patil
uddhav Thackeray CM News: महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com