PM Politics : 19 डिसेंबरला राजकीय भूकंप, मराठी माणूस पंतप्रधान होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Prithviraj Chavan BJP Marthi PM Politics : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दावा केला की, सध्याचे पंतप्रधान बाजुला होणार असून नवीन पंतप्रधान जे होतील ते मराठी असतील.
Prithviraj Chavan  Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Prithviraj Chavan Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkarisarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan News : दिल्लीच्या राजकारण मोठा भूकंप होणार असून आत्ताचे पंतप्रधान बाजुला होतील आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. ते म्हणाले होते की महिनाभरात हा बदल होईल. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी थेट तारीख सांगत 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे सांगितले.

ते म्हणाले, नवीन पंतप्रधान हा काँग्रेस नसणार आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडे तेवढे संख्याबळ नाही. त्यामुळे भाजपमधीलच नवीन चेहरा पंतप्रधान होईल. आणि कदाचित मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे म्हटले मात्र कोणता मराठी नेता पंतप्रधान होईल, याबाबत बोलण्याचे टाळले. त्यामुळे नितीन गडकीर यांच्याकडे चव्हाण हे अंगुलीनिर्देश करत असल्याची देखील चर्चा आहे.

Prithviraj Chavan  Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचेच, कायदा सुव्यवस्था अन् भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून वडेट्टीवारांनी सरकारवर सुनावलं

अमेरिकन संसद जेव्हा एपस्टाईन फाइल्सची माहिती जाहीर करेल तेव्हा त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होतील ? असे सूचक ट्विट देखील त्यांनी केले होते. या ट्विट त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले होते.

एपस्टाईन फाइल्स प्रकरण काय?

अमेरिकेतील उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना त्यात गुंतवले आहे. त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावे आहेत. त्यामध्ये आपल्या देशातील नेत्यांची नावे आहेत का हे पहावे लागेल. या ‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणाचा भारतीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो, असा दावा चव्हाण यांनी केला होता. फाईल अमेरिकेच्या संसदेने ताब्यात घेतली आहे. ती फाईल खुली करण्याची मागणी केली जात आहे.

Prithviraj Chavan  Narendra Modi | Amit Shah | Devendra Fadnavis | Nitin Gadkari
Pune BJP: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी लावला जोर, काही मुलाखती एका मिनिटात उरकल्या तर काही पाच मिनिटांपर्यंत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com