Prithviraj Chavan Controversial Statement : 'भगवा नव्हे सनातनी, हिंदुत्ववादी आंतकवाद...', पृथ्वीराज चव्हाण चिदंबरम, दिग्विजय सिंगाच्याही एक पाऊल पुढे

Prithviraj Chavan Hindutva sanatani Terrorism : पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या मुंबईत कार्यालयावर मोर्चा काढत चव्हाण यांनी माफी मागावी अशी विनंती केली आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan News : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर हिंदुत्वावादी संघटनांनी तसेच राजकीय पक्षांकडून भगवा आंतकवाद हा खोटा शब्द काँग्रेसने आणला अशी टीका केली. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना खळबळजनक वक्तव्य केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'भाजपच्या लोकांनी असेल किंवा आमच्या काँग्रेसच्या लोकांनी असेल कृपया भगवा शब्दाचा वापर करू नका. महाराष्ट्रात आमच्या करता भगवा पवित्र, स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे. स्वातंत्र मिळण्याच्या साडेतीनशे वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे.'

'भगवा रंग संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वारकरी पंथाचा रंग आहे. तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कोणी पाॅलिटिकल लेबल कृपा करून देऊ नका. म्हणायचे असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्वावदी म्हणा. भगवा म्हणू नका ही माझी विनंती आहे.'

चव्हाणी यांनी भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर करू नका, असे म्हणताताना त्याला सनातनी म्हणा, हिंदुत्वावदी म्हणा असे सांगत नव्याच वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या मुंबईत कार्यालयावर मोर्चा काढत चव्हाण यांनी माफी मागावी अशी विनंती केली आहे.

Prithviraj Chavan
Karnataka Lokayukta Raid: 15 हजार रुपयांची सॅलरी असलेल्या क्लार्ककडे आढळले 24 घरं, 4 आलिशान कार अन् सोन्या-चांदीचं घबाड

चिदंबरम, सिंग यांच्याही पुढे...

सर्वप्रथम युपीए सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या पी चिदंबरम यांनी भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी देखील याच शब्दाचा वापर करत हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली होती. आणि मालेगाव बाॅम्बस्फोटातील आरोपी निर्दोष सुटल्यानंतर भगवा आतंकवाद या शब्दाचा वापर करू नका, असे म्हणताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा, असे सूचवत चिदंबरम, दिग्विजय सिंग यांच्याही एक पाऊल पुढे टाकल्याची टीका हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Prithviraj Chavan
Ajit Pawar Hinjawadi Sarpanch Clash : "विकासकामांना विरोध नाही पण ते फक्त आयटीवाल्यांचं..."; अजितदादांनी झापलेल्या हिंजवडीच्या सरपंचांनी अखेर आपली बाजू मांडलीच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com