Ajit Pawar Hinjawadi Sarpanch Clash : "विकासकामांना विरोध नाही पण ते फक्त आयटीवाल्यांचं..."; अजितदादांनी झापलेल्या हिंजवडीच्या सरपंचांनी अखेर आपली बाजू मांडलीच

Ajit Pawar And Hinjawadi Sarpanch controversy : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी भल्या पहाटे हिंजवडी येथील विविध विकासकामांची पाहणी केली होती. यावेळी त्यांचा आणि हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
Ajit Pawar And Hinjawadi Sarpanch controversy
Ajit Pawar during early morning inspection of Hinjawadi development works, addressing concerns about IT Park and local infrastructure planning.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Aug : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी भल्या पहाटे हिंजवडी येथील विविध विकासकामांची पाहणी केली होती. यावेळी त्यांचा आणि हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये त्यांनी सरपंचांना चांगलंच सुनावलं होतं. "धरण करताना मंदिर जातातच की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो. आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बाहेर चाललाय, बेंगलोरला हैदराबादला पण तुम्हाला त्याचं काय तुम्हाला पडलं नाही"; अशा शब्दात त्यांनी सरपंचांना झापलं होतं.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर आणि व्हायरल व्हिडिओवर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, अजितदादांच्या विकासकामांना आमचा विरोध नाही, पण ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत. ते आयटीवाल्याचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावत नाहीत", असा आरोप जांभुळकरांनी केला.

Ajit Pawar And Hinjawadi Sarpanch controversy
Shivsena Politics : "शिंदेंच्या त्रासाला कंटाळून म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, पण ठाकरेंच्या आदेशामुळे..."; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा खळबळजनक दावा

तसंच यावेळी त्यांनी सांगितलं की, मी अजितदादांकडे गावातील विविध प्रश्न मांडण्यासाठी गेलो होतो. छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक आणि वाकड चौक, या रस्त्यांचे रुंदीकरण कमी करावं अशी मागणी आम्ही केली होती. कारण तिथे आमच्या शाळा, ग्रामपंचायती आणि काही घरे शिवाय स्मशानभूमी आहे, त्यामुळे मी त्या दिवशी दादांना रस्त्याचं रुंदीकरण कमी करावी अशी विनंती करायला गेलो होतो.

मात्र, त्यावेळी तिथे शाब्दिक झालं पण ते काय रागवले नाहीत, थोडा गैरसमज झाला आणि त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. मात्र, त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की, मी कोणावर रागवलो नाही. आम्ही दादांना भेटायला पुन्हा वेळ मिळत नाही म्हणून पहाटे पाचला जाऊन थांबलो होतो.

Ajit Pawar And Hinjawadi Sarpanch controversy
Tuljabhavani temple : तुळजाभवानी मंदिरातील तलवार गायब, मंत्रोपचाराने देवीची शक्ती काढल्याचा पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा

गावच्या प्रश्नांसाठी तिथे आम्ही गेलो होतो. दादा आम्हाला विश्वासात घेत नाहीत. त्यांना आयटीएन्स वेगळं सांगतात, दादा त्यांचं ऐकतात, ग्रामपंचायत विकासाच्या आड येते असा दादांच्या मनात आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेला असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, हिंजवडीच्या रस्त्यांविषयी योग्य मार्ग काढला नाहीतर आम्हाला न्यायालयात जावं लागेल असा इशारा देखील सरपंचांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com