Background of the Koregaon Park Land Transaction : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आला असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीवर सरकारी जमीन खरेदी केल्याचे आरोप होत आहेत. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. याबाबत अजित पवार यांनी शुक्रवारी मीडियाशी बोलताना सांगितले की, या व्यवहारात एकाही रुपयाही दिला गेलेला नाही. एक रुपयाचा व्यवहार झालेला नसताना नोंदणी कशी झाली, पुढील प्रक्रिया कशी झाली हे तपासातून समोर येईल.
कुणी, कुणाची फसवणूक केली, कुणी दबाव आणला, कुणाचे फोन गेले, अधिकाऱ्यांनी सह्या कशा केल्या हे सगळं तपासात समोर येईल. मला व्यवहार झालेला माहिती नव्हता. माहिती असते तर आधीच सांगितले असते. नियमाबाहेर जाऊन कुणीही काही केले तर मला ते चालणार नाही. मी माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही विचारले की डीसीएम ऑफिसमध्येही विचारणा करण्यात आली की इथून कुणी फोन केला होता का. तिथून कुणीही फोन केला नव्हता, असे अजित पवार यांनी सांगितले.
मला आज संध्याकाळी समजले की जे कागदपत्रे करण्यात आली होती, व्यवहार झाला होता, ते रद्द करण्यात आले आहेत. तसेच आज समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीही पारदर्शकपणे काम करेल. यापुढे अधिकाऱ्यांनी एखादे प्रकरण तुमच्यासमोर आले आणि ते नियमांत बसत नसेल तर कुठल्याही दबावाखाली न येता त्यावर काट मारायची. कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो की माझ्या नावाचा वापर केला असेल तर. मला हे चालणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.
जिथे चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याची चौकशी करावी. मागील काळातही मी कोणत्याही नियमाला बगल देऊन काम केलेले नाही. या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस पोलिसांचे काम करतील. त्यातही राजकीय हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. पारदर्शकपणे तपास झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.