Farmer Loan Waiver Scheme: शेतकऱ्यांनो, कर्जमाफीचा लाभ घ्यायचायं, तर तातडीने 'ही' नोंदणी करा!

Farmers Registration ON Agristack:बहुसंख्य शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.काहींची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Farmers Registration ON Agristack
Farmers Registration ON Agristacksarkarnama
Published on
Updated on

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफीची घोषणा केली. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पण या नोंदणीकडे अनेक शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची माहिती आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

शेतकर्‍यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी करण्यात येणार आहे. त्यांच्या सातबारावरील थकबाकी कमी होईल. पीक कर्ज देणाऱ्या कोणत्याही बँकेतील दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात येणार आहे. पण एक अपडेट समोर येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ अॅपवर नोंदणी करणं सक्तीचे आहे. पण बहुसंख्य शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.काहींची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Farmers Registration ON Agristack
Deepak Paygude News: मनसेचे माजी आमदार मध्यरात्री रस्त्यावर सिमेंटमध्ये जाऊन बसले! नेमकं काय घडलं?

भविष्यातील कर्जमाफी योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक अॅपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या कर्ज निवारण प्रक्रियेसाठी अचूक माहिती डिजिटल स्वरूपात असणे गरजेचे आहे.

Farmers Registration ON Agristack
Nashik Housing Scandals: अधिकाऱ्यांची अजब कारवाई! बिल्डर सोडून जमिनीवर गुन्हा दाखल; शंभूराजे देसाई भडकले

ही माहिती चुकीची किंवा अपूर्ण राहिल्यास संबधित शेतकऱ्यांनी माहितीची नोंद पोर्टलवर होणार नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत, पण त्यांनी ही नोंदणी केली नाही तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com