Radheshyam Mopalwar News : आमदार रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांनी तीन हजार कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप विधिमंडळात केला. मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या देखरेखीखाली समृद्धी महामार्गाची बांधणी झाली आहे. मात्र, समृद्धीच्या कामातून मोपलवार यांनी स्वतःचे आणि कंत्राटदारांचे भले केले. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्याचे आरोप झाले आहेत.
गेल्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना- नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना एक हजार कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. या घोटळ्याच्या चौकशीची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली होती.
जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन तीन वर्षांपूर्वी लिक झाला होता. हा महामार्ग होणार याची कल्पना असल्यामुळे काहींनी ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या होत्या. जमीन खरेदी केल्यावर याठिकाणी रातोरात फळबागा दाखवत कोट्यावधी रुपये मिळवले.
स्टँप पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 1995 साली स्टँप कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टँप आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार Radheshyam Mopalwar यांनी कोर्टात दिली होती.
समृद्धी महामार्गाचे पॅकेज क्रमांक 11 चे 1900 कोटींचे टेंडर गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले होते. हे काम आपल्याला जमणार नाही, असे या कंपनीने 2021 मध्ये कळवले. त्यानंतर ते काम हुजूर मल्टिप्रोजेक्ट कंपनीला देण्यात आले. या कंपनीचे 23 लाख शेअर्स मोपलवार यांच्या कुटुंबियांकडे आहेत.
मोपलवार यांच्या कन्या तन्वी यांच्याकडे या कंपनीचे 3 लाख 98 हजार समभाग, तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हाजार 645 समभाग आहेत. हुजूर मल्चिप्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार शेअर्स असलेली मेलोरा इन्फ्रा कंपनी तन्वी मोपलवार यांची आहे. मोपलवारांच्या दुसऱ्या पत्नीकडे150 कोटी, तिसऱ्या पत्नीकडे 300 कोटी आणि मुलींची संपत्ती 850 कोटी रुपयांची आहे. असा आरोप आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी केला आहे.
समृद्धी महामार्ग प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्त यांच्यात सेटलमेंट सुरू असल्याचे संभाषण होते. या ऑडिओमध्ये समृद्धी महार्गातील जमीन लाटल्याचे देखील सांगितले जात होते.
या ऑडिओ टेपवरून राज्य सरकारने मोपलवार यांना एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन दूर केले होते. त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, चौकशी समितीने मोपलवारांना क्लीन चिट दिली होती.
निवृत्तीनंतर तब्बल सात वेळा मोपलवार यांना विक्रमी मुदतवाढ मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मोपलवारांना मुदतवाढ मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.