Rahul Gandhi News : लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात ते महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसची भूमिका आणखी बळकट करण्यासाठी हा दौरा असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त काँग्रेसचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत.
राहुल गांधींच्या दौऱ्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य येईल, असे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. त्यानंतर अनेक नेते काँग्रेसला सोडून गेले आहेत. महाविकास आघाडी एकत्र आहे मात्र त्यांच्या एकवाक्यता दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसची पुढची दिशा ठरवण्यासाठी राहुल गांधींचा दौऱ्या महत्त्वपूर्ण मानला जातो आहे.
राहुल गांधी हे पळणार नेते आहेत, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सपकाळ म्हणाले,'राहुल गांधी भेटणारे आहेत, पळणारे नाहीत. रामलीला मैदानावर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, 'मी पळणारा नाही, मी गांधी आहे, मी सावरकर नाही.' त्यामुळे राहुल गांधींचं हे निडर व्यक्तिमत्त्व समजून घ्यावं. राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत ते सातत्याने मैदानात आहेत. पळून गेलेल्यांनाही माहीत आहे की ‘लढणारे नेते’ आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.