Raj Thackeray : 'ती' डॉक्युमेंट्री राज ठाकरेंनी डिलिट केली, म्हणाले, 'मुंबई पोलिस आयुक्तांनी...'

Raj Thackeray Deletes Modi-Adani Documentary : डॉक्युमेंट्री अचानक डिलीट करण्यात आल्याने सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यावर स्वतः राज ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडत यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची चर्चित डॉक्युमेंट्री आपल्या सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून ही पोस्ट डिलीट करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्री आणि त्यातून भारतीय उद्योग जगतावर अदानी समूहाचे निर्माण होत असलेले वर्चस्व, या विषयावर सबीर भाटिया यांनी एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. ही डॉक्युमेंट्री राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर शेअर केली होती. या व्हिडिओला अवघ्या काही दिवसांत एकट्या ट्विटरवर ४८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले, तर फेसबुकवरही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "सबीर भाटिया यांनी बनवलेली डॉक्युमेंट्री पोस्ट केल्यानंतर तिला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून 'वरच्यांच्या' पोटात गोळा आला आणि गुपित फुटल्याची भीती निर्माण झाली. या भीतीपोटीच मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत मला ही डॉक्युमेंट्री हटवण्याची विनंती करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आहे, म्हणूनच मी पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून ही डॉक्युमेंट्री डिलीट करत आहे," असे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray: जरांगेंनी केली ऑडिओ क्लिप व्हायरल, राज ठाकरे काय बोलले?

'माझा लढा एकाधिकारशाहीविरोधात'

पोस्ट डिलीट केली तरी आपला हेतू साध्य झाल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे. "मला जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, तो पोहोचला आहे. जी आग लागायची ती लागली आहे," असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले, "माझा कोणत्याही एका व्यक्तीला विरोध नाही, तर देशात निर्माण होत असलेल्या एकाधिकारशाहीला विरोध आहे. पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योजकांना मोठे करावे, रोजगार निर्माण करावा, पण एकाचेच लाड करून देशाला धोक्यात आणले जात असेल, तर आमचा विरोध कायम राहील."

महाराष्ट्रातील जमिनी परराज्यांतील कंपन्यांच्या घशात?

यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही घणाघाती टीका केली. भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरातच्या टोरेंट कंपनीला देण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. "महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि मंत्री सत्तेसमोर इतके शरण का जात आहेत? आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना कोणाची तळपायाची आग मस्तकात का जात नाही?" असा सवाल करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र तीव्र संताप व्यक्त केला.

शिवतीर्थावरील सादरीकरणाची आठवण

जानेवारी २०२६ मध्ये मुंबईतील शिवतीर्थावरून अदानी समूहाच्या संदर्भात सादर केलेले अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन आजही सोशल मीडियावर उपलब्ध आहे आणि ते तिथेच राहील, असे सांगत मनसेने या एकाधिकारशाहीविरुद्ध टाकलेली ठिणगी आता वणवा बनली असल्याचे राज ठाकरेंनी ठामपणे सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray News: दुष्काळाचं भीषण संकट..! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोठा निर्णय, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; मनसैनिकांना दिले महत्त्वाचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com