Raj Thackeray speech : ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकतात... राज ठाकरेंनी आडवाणींपासून ते जयललितांपर्यंत सगळ्याचं शिक्षण काढलं

Raj Thackeray’s Criticism of Political Icons: From Advani to Jayalalithaa : राज ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडीयममध्ये शिकली हो शिकली. सन्मानीय बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील इंग्रजी मीडीयममध्ये शिकले आहेत.
Raj Thackeray speech
Raj Thackeray speech Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray speech : हिंदीसक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महायुती सरकारने हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन्ही शासकीय आदेश रद्द केले. त्यानंतर महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज (ता. ५) मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, माघार घेतल्यानंतर मग काय करायचं तर हे प्रकरण वेगळ्या ठिकाणी वळवायचं... म्हणून मग ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडीयम मध्ये शिकली असा मुद्दा उकरुन काढला. मग पुढे..म्हणजे दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडीयमध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध असा सवाल राज ठाकरेंनी केला.

कुणाकुणाची मुलं परदेशात शिकताय याच्या याद्या आमच्याकडे आहे. त्याचं तुम्ही काय करणार आहात. त्यातल्या त्यात मंत्रिमंडळातील एका-एकाचं हिंदी ऐका फेफरं येईल फेफरं..हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडीयममध्ये शिकली हो शिकली. यावर तुम्ही प्रश्न उपस्थित केला की यांना मराठीचा पुळका कसा, हे यांची मुलं तर इंग्रजीमीडियमध्ये टाकतात. सन्मानीय बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडीयममध्ये शिकले आहेत. या दोघांवर तुम्ही मराठी बद्दल शंका घेऊ शकता का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Raj Thackeray speech
Raj Uddhav Thackeray unity : राज ठाकरेंनी भाजप, फडणवीसांच्या कारभाराची पिसे काढली : उद्धवने दिली पाठीवर कौतुकाची थाप

ते पुढे म्हणाले, लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंटमध्ये आडवाणी शिकले. दक्षिण भारतात बघा. तामीळच्या प्रश्नावर, तेलगुच्या प्रश्नावर कडवडपणे समोर येवून उभे राहतात. त्यांना कुणी विचारत नाही तुम्हची मुलं कुठं शिकली अन् तुम्ही कुठे शिकलात ते... उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काही प्रॉब्लेम आहे?असा सवाल राज ठाकरेंना केला.

Raj Thackeray speech
Raj Thackeray : महाराष्ट्र, मराठीच्या मुद्यावर राज ठाकरे प्रचंड आक्रमक; 'शांत म्हणजे गांडू नाही...कुणाची माय...', उद्धव ठाकरेंसमोर हिंदी समर्थकांना सोलून काढले

राज ठाकरे म्हणाले मी दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमांत शिकलेले नेते व अभिनेते यांची यादी आणली आहे. ती त्यांनी वाचून दाखवली ..जय ललिता, स्टॅलिन, कनिमोझी, उदय निधी, चंद्राबाबू नायडू, पवन कल्याण, नारा लोकेश, कमल हसन, अभिनेता विक्रम, अभिनेता सूर्या, एआर रहमान या सगळ्या दक्षिण भारतातील नेते व अभिनेत्यांची जे इंग्रजी माध्यमात शिकले त्यांच्या स्कूल व नावांची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com