Raj Thackeray : चंद्रकांतदादा अन् चहा; काय चर्चा झाली? मी काय त्यांच्या कडेवर बसलो होतो का?; राज ठाकरे भडकलेच

Raj Thackeray On Chandrakant Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेळाव्यात रोखठोक भूमिका घेत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.
Chandrakant Patil And Raj Thackeray
Chandrakant Patil And Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता.30) मुंबईतल्या वरळी या ठिकाणी पक्षाचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभेतील पराभवावर भाष्य करत भाजपच्या भूमिका बदलावर जोरदार निशाना साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भेटायला येणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर देखील भाष्य करताना, चहा घ्यायला येणाऱ्यांना नका येऊ असं सांगणार का? असा सवाल करत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा किस्सा सांगितला. तर चंद्रकांत पाटील यांनी त्यावेळी तसे का केलं यावर खिल्ली उडवली.

आता त्यांना काय सांगणार?

सध्या राज्यात राजकारणाचा पूर्ण चिखल झाला असून सर्वच आपली भूमिका बदलत आहेत. पण मी तुम्हाला विकायला बसलेलो नाही. मी खमका असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी, कार्यकर्त्यांना जागरुक राहिलं पाहिजे, असा कानमंत्र दिला आहे. तर जे भाजपचे नेते भेटायला येतात त्यांना आता नको म्हणायला हवं का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच जर एखादा नेता घरी चहाला येतो असे म्हणत असेल तर त्याला काय सांगायचं? घरीच चहा पी म्हणून का. पण जेव्हाही कोणी भेटायला आलं की सुरू झाल्या कहाण्या. पण मी, तुम्हाला विकत नाही. माझा मराठीचा बाणा बोथट झालेला नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी पत्रकारांचा समाचार घेतला आहे.

Chandrakant Patil And Raj Thackeray
Raj Thackeray : 'माझा आणि ईडीचा संबध काय?', राज ठाकरेंनी मेळाव्यात सांगितलं

तर यावेळी त्यांनी नाशिकमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या भेटीचा किस्सा सांगताना, नाशिकमध्ये चंद्रकांतदादांनी, मुंबईत आलो की चहा प्यायला येतो असे म्हटले होते. मग त्यावर मी त्यांना या असे म्हटले होते. जर असंच तुम्हाला कोणी विचारल्यास काय म्हणणार? चहा कशाला प्यायचा? कशाला घरी येता? असं म्हणणार का?

पण तसं का केलं हेच कळलं नाही - राज ठाकरे

यावेळी हा किस्सा सांगताना, चंद्रकांत पाटील यानंतर घरी आले चहाही घेतला आणि ते गेले देखील. त्यावेळी बरेच दिवस आपण भेटलो नाही, म्हणत त्यांनी भेट घेतली होती. पण यावेळी काय झाले असावे, अशा चर्चा रंगल्या होत्या. आता यावर काय सांगावं? सहज भेट होती, सदिच्छा भेट होती की आणखी काही, असंही राज ठाकरे यांनी म्हटले.

Chandrakant Patil And Raj Thackeray
Raj Thackeray : लोकांनी केलेले मतदान कुठे झाले गायब ? विधानसभा निकालानंतर EVM वर राज ठाकरेंचे प्रथमच भाष्य

तर चंद्रकांत पाटील यांनी खांदा उंच करुन शक्ती दाखवल्यासारखी कृती केली. ती त्यांनी का केली? मला अजूनही कळलेलं नाही. या भेटीनंतर पत्रकार मला विचारत होते त्यांनी असं का केलं? मी म्हटलं म्हणजे काय? आम्ही दोघंही एकमेकांना तोच प्रश्न विचारत होतो. बाई आणि बुवा एकत्र भेटले की लफडंच असलं पाहिजे असं कदाचित पत्रकारांना वाटतं.

लोक नॉर्मलही भेटू शकतात हे पचणी पडत नाही. पण त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ती कृती का केली? याचं मला काही माहिती नाही. काय मला त्यांनी कडेवर घेतलं होतं की मी कोपरात अक्रोड ठेवून त्यांना फोडून दाखवला. काय मला काहीच कळलं नाही, अशी खोपरं खळी देखील यावेळी राज ठाकरे यांनी लगावली आहे. तर कोणीही भेटला म्हणून मी पक्षाचं प्रेम आणि धोरण बाजूला ठेवणार नाही, असे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com