Raj Thackeray : 'माझा आणि ईडीचा संबध काय?', राज ठाकरेंनी मेळाव्यात सांगितलं

Raj Thackeray ED : राज ठाकरे ईडीच्या नोटीशीला घाबरले आणि त्यांनी मोदींची स्तुती केली, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली गेली. त्यावर राज ठाकरे पहिल्यांदा बोलले आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News: लोकसभा निवडणुकीत भाजपला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठींबा दिला. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे जिल्ह्यात जाहीर सभा देखील घेतल्या. राज ठाकरें यांच्या मागे ईडी लावल्यामुळे त्यांनी भाजपला पाठींबा दिल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते त्यावेळी करत होते. त्यावर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी त्यांचा आणि ईडीचा काय संबध, हे मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात सांगितले आहे.

राज ठाकरे म्हणाले, मला ईडीची नोटीस आली. मी व्यवसाय सुरू केला होता. पण मी ज्या कंपनीतून बाहेर पडलो होतो. पैसे घेताना टॅक्स भरला होता. दुसऱ्या कंपनीत देखील टॅक्स भरला होता. तरी मला नोटीस आली. मी विचारले असं का? तर ज्या पार्टनरकडे टॅक्स भरण्यासाठी पैसे दिले होते. त्याने टॅक्स भरलाच नव्हता ते परस्पर दुसऱ्या कामासाठी वापरले होते. मग आमची चूक नसतानाही आम्ही परत टॅक्स भरला.

Raj Thackeray
Raj Thackeray : 'त्यांनी केलं ते प्रेम, पण आम्ही केलं ते बलात्कार'; बदलत्या भूमिकेवर राज ठाकरे यांचा घणाघात

ईडीच्या नोटीशीला राज ठाकरे घाबरला आणि मोदींची स्तुती करतोय, अशी टीका केली गेली. पण आम्ही बाकीच्यान सारखे घाबरणारे नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

राज यांनी भाजपवर देखील निशाणा साधाला ते म्हणाले, ज्यांना सर्वाधिक भ्रष्टाचारी म्हणून टीका केली त्या हेमंत बिस्वा शर्मांना दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षात घेतले. मुकूल राॅय यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप होते त्यांना भाजपात घेत मोठे पद दिले. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना सोबत घेतलं आणि पदं दिली. भाजपने आरोप केलेले सर्व जण हे भाजपसोबत आण मंत्रिमंडळात आहेत.

राजू पाटलांना एकही मत नाही

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जे निवडून आलेत त्यांचही विश्वास नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सन्नाटा पसरला होता. एवढा सन्नाटा मी कधीच पाहिला नाही. त्यानंतर मी विचार करीत होतो. या निकालावर विश्वासच बसत नाही. राजू पाटलांना त्यांच्या गावातील एकही मत पडले नाही, 1400 मतदान असलेल्या राजू पाटलांनी त्यांच्यागावातून एकही मत का पडले नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray
Beed Political News : अजित पवार कारने , तर त्यांच्या हेलिकॉप्टरमधून पंकजा मुंडे बीडला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com