BJP On Raj-Uddhav Alliance : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होताच भाजपची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'गमावलेली राजकीय स्पेस ...'

Ashish Shelar Keshav Upadhyay : जो मुद्दाच नाही त्याच्यावर तुम्ही मोर्चा काढताय. मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्रातील जनता इतकी दुधखुळी समजता का? असा प्रश्न भाजप नेत्यांनी विचारला आहे.
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Raj-Uddhav Alliance News : पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध करणाऱ्यावर ठाकरे बंधुमध्ये एकमत झाले आहे. हिंदीच्या अंमलबजावणी विरोधात राज ठाकरे हे पाच जुलैला मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येत असताना भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, पहिल्यापासून तिसरी भाषा आहे ती तोंडी आहे. त्यात लेखीचा समावेश नाही. हिंदी ही सक्तीची आहे असे म्हणून गैरसमज पसरवले जात आहेत. हे समजायला मराठी माणूस काही दुधखुळा नाही. याचे जो राजकारण करत असेल त्याला राजकीय उत्तर दायला भाजप सक्षम आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले, आपली गमावलेली राजकीय स्पेस,राजकीय पत, पुन्हा मिळण्यासाठी केलेली ही धडपड आहे. यांना मराठी भाषेबद्दल काहीच देणघेणं नाही. जिथे महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी भाषेची सक्ती आहे. हिंदी भाषेची सक्तीच नाही मग असं असताा साप साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्ष्यात येणार नाही का?

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
Babanrao Lonikar Issue: मंत्री छगन भुजबळ यांनी बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याविषयी स्पष्टच बोलले, म्हणाले...

'जो मुद्दाच नाही त्याच्यावर तुम्ही मोर्चा काढताय. मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्रातील जनता इतकी दुधखुळी समजता का? त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सांगितले पाहिजे की बीएमसीच्या मराठी शाळा इंग्रजी शाळा बनवण्याचा घाट आदित्य ठाकरेंनी केला होता तेव्हा मराठी प्रेम कुठे गेलं होतं?', असा प्रश्न देखील केशव उपाध्याय यांनी विचारला.

शिंदेची शिवसेना 'वेट अँण्ड वाॅच'च्या भूमिकेत

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, दोन मोर्चे आहेत. त्याची व्याख्या मी अशी करतो की, एकनाने हिंदी स्वीकारली. हिंदी सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला. त्यांचा एक मोर्चा आहे. आणि एक मोर्चा राज ठाकरेसाहेबांचा आहे. त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. हे त्यांच्या मोर्चात जातायेत आणि ते त्यांच्या मोर्चात जातायेत. आपण वेट अँड वाॅचच्या भूमिकेत आहेत

Devendra Fadnavis uddhav Thackeray Raj Thackeray
BJP Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्यापूर्वी भाजपनं टाकला डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com