
Shivsena Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला आहे. कोकणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. इन्कमटॅक्स विभागाच्या कारवाईनंतर देखील ठाकरेंना साथ देणार माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडली आहे.
उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करताना राजन साळवी यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या (गुरुवारी) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राजन साळवी यांना आपल्या पक्षात घेत एकनाथ शिंदेंनी कोकणातील ऑपरेशन टायगर यशस्वी केले आहे.
राजन साळवी यांचा विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला होता. हा पराभव आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्याने साथ न दिल्याने झाल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला होता. त्यांनी आपली नाराजी उघड बोलून दाखवताना उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.
राजन साळवी यांनी आपल्या पराभवासाठी माजी खासदार विनायक राऊत यांना जबाबदार धरले होते. मात्र, माध्यमांसमोर त्यांचे थेट नाव घेतले नव्हते. मात्र, ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी यांना थांबण्याचे प्रयत्न केले जातील, अशी शक्यता होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 'ऑपरेशन टायगर'द्वारे ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देणार असल्याचे सांगितले होते.
राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांनी प्रवेश दिला असला तरी किरण सामंत विरुद्ध राजन साळवी असा वाद मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. हा वाद टाळण्यासाठी राजन साळवी यांना विधान परिषद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.