NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी राजेश विटकरांचे नाव फायनल ? दुसऱ्या नावावर चर्चा सुरूच

Vidhanparishad Election News :लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11जागांसाठी निवडणूक होत आहे.
Rajesh Vitekar
Rajesh VitekarSarkarnama

Mumbai Political News : आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक नाव फायनल करण्यात आले आहे तर उर्वरित एक जागांसाठी नाव निश्चित करण्यात आले नसून त्यावर चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच आमदारातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11जागांसाठी निवडणूक होत आहे. 12 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत तर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वाट्याला दोन तर शिंदे गटाच्या वाट्याला दोन जागा येणार आहेत.

तर उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठीचे नाव निश्चित करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा कोअर कमिटीची बैठक अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडली.

या वेळी अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटकरांचे (Rajesh Vitekar) नाव जवळपास फायनल करण्यात आले असल्याचे समजते. तर दुसऱ्या नावावर बैठकीत अद्याप एकमत झाले नसल्याने चर्चा सुरूच असल्याचे समजते.

राजेश विटकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी ही जागा महायुतीमध्ये महादेव जानकर यांच्या रासपला सोडण्यात आली. त्यामुळे विटेकर यांना निवडणूक लढता आली नव्हती.

Rajesh Vitekar
Devendra Fadnavis News : राज्यातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण; फडणवीसांची पोस्ट चर्चेत

जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विटेकर यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन सर्वांसमोर दिले होते. त्यामुळे या विधानपरिषदेच्या जागेसाठी विटेकर यांची दावेदारी मजबूत आहे. तर दुसऱ्या नावावर चर्चा सुरु असल्याचे समजते.

या कोअर कमिटीच्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मदत आणि पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Rajesh Vitekar
Uddhav Thackeray News : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन तयार; रणनीतीनुसार राज्यभर तयारी सुरु

दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या महादेव जानकर यांना पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर उर्वरित चार जागांसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, परिणय फुके, सुधाकर कोहळे, अमित गोरखे, निलय नाईक, योगेश टिळेकर, माधवी नाईक या दहा जणांची नावे चर्चेत आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असलेल्या दोन जागांपैकी एका जागेसाठी माजी खासदार भावना गवळी यांच्या नावाची चर्चा आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नसीम खान, मुझफ्फर हुसेन यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडीकडून एक जागा मित्रपक्ष असलेल्या शेकापला सोडली जाणार आहे. शेकापकडून जयंत पाटील मैदानात उतरणार आहेत.

Rajesh Vitekar
Supriya Sule News : आता त्यांना लाडकी बहीण, भाऊ सगळे आठवतील; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com