Uddhav Thackeray News : विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन तयार; रणनीतीनुसार राज्यभर तयारी सुरु

Shivsena Politics News : लोकसभेप्रमाणे घवघवीत यश मिळवण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार जुलै महिन्यापासूनच राज्यभर दौरा करण्याचा मेगाप्लॅन उद्धव ठाकरे यांनी आखला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Vidhansabha Election : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे हुरळून न जाता चार महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेना ठाकरे गटाने जोमाने सुरु केली आहे.

लोकसभेप्रमाणे घवघवीत यश मिळवण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे. त्यानुसार जुलै महिन्यापासूनच राज्यभर दौरा करण्याचा मेगाप्लॅन उद्धव ठाकरे यांनी आखला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत महायुती सरकारला चांगलाच धक्का देत जागेवर आणले आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे गटाने राज्यभरात 22 लोकसभा जागा लढवत 9 जागी विजय मिळवला आहे.

त्यामुळे ठाकरे गटाचा उत्साह चांगलाच दुणावला आहे तर आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळयांसमोर ठेवून रणनीती आखण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. (Uddhav Thackeray News)

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) 7 जुलै पासून राज्याचा दौरा करणार आहेत. राज्यभरातील शिवसैनिकात चेतना आणि ऊर्जा येण्यासाठी ‘शिवसंकल्प’ मेळाव्याचे आयोजन करण्यात केले आहे. राज्यभर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मेळावे घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापासून या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी मेगाप्लॅन आखला आहे. शिवसेना पक्षाच्या फूटीनंतर पहिल्याच परीक्षेला लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे यांना 9 जागी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून जुलै महिन्यापासूनच राज्यभर दौरा करण्याचा मेगाप्लॅन ठाकरे यांनी आखला आहे.

Uddhav Thackeray
Supriya Sule News : आता त्यांना लाडकी बहीण, भाऊ सगळे आठवतील; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

एकीकडे विधानसभा निवडणुकीची महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच घटक पक्ष तयारी करत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसला विदर्भासह 13 जागा मिळाल्याने पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. राज्यात शिवसेनेची ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे उद्धव ठाकरे येत्या दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे मेळावे घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.

7 जुलैला ‘शिव संकल्प’ मेळावा

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देऊन गद्दारांचा कडेलोट करण्यासाठी ‘शिव संकल्प’ मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात 7 जुलैला सकाळी 10 वाजता सूर्या लॉन्स बीड बायपास येथे शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav Thackeray
Devyani Pharande News : आमदार फरांदेंचा अजब दावा; म्हणतात, 'तो तर जुगाराचा अड्डा '

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com