Rajratna Ambedkar  n manoj jarange patil
Rajratna Ambedkar n manoj jarange patilsarkarnama

Rajratna Ambedkar : भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येणार! आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Rajratna Ambedkar Manoj Jarange Patil assembly Election 2024 :राज्यातील सामान्य गरीब लोक विधानसभेत गेले पाहिजे. राज्यात आलटून पालटून महाविकास आघाडी महायुतीची सत्ता येत आहे. आम्ही महाराष्ट्रात नवे समीकरण घडवून आणत आहोत, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले.
Published on

Rajratna Ambedkar News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार की नाही, याचा निर्णय 29 ऑगस्टला घेणार आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाच्या आधी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे नेते त्यांची भेट घेत आहेत.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.

राजरत्न आंबेडकर यांनी नुकताच नवा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे राज्यात भीमशक्ती-शिवशक्ती नवे समीकरण तयार होणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 'राज्यातील सामान्य गरीब लोक विधानसभेत गेले पाहिजे. राज्यात आलटून पालटून महाविकास आघाडी महायुतीची सत्ता येत आहे. आम्ही महाराष्ट्रात नवे समीकरण घडवून आणत आहोत. अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत', असे राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर म्हटले.

Rajratna Ambedkar  n manoj jarange patil
Raju Shetti-Tanaji Sawant : सोलापुरात राजू शेट्टी-तानाजी सावंतांची भेट; एक तास चर्चा, भेटीनंतर शेट्टी-सावंत म्हणाले...

तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न?

राजरत्न आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवर टीका केली. महायुती, महाविकास आघाडी प्रस्थापितांना विधानसभेत पाठवते. राज्यातील गरीब विधानसभेत गेला पाहिजे. महाराष्ट्रात नवी समीकरण आम्ही घडवत आहोत, अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत, असे म्हणत राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडी प्रयत्न करत असल्याचे संकते दिल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाला पाठींबा

राजरत्न आंबेडकर यांनी याआधीच मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शवला होता. गरीब मराठा समाजा हा प्रशासनात, न्यायालयात, राजकारणात मोठ्या पदावर नाही. त्यांना तेथे संधी मिळाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी प्रथम जेव्हा आंदोलन सुरू केले होते तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत मराठा आरक्षणाला पाठींबा दिला होता, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले होते.

संभाजीराजेंशी जवळीक?

राजरत्न आंबेडकर यांनी राजकारणात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी एका कार्यक्रमात केले होते. संभाजीराजे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील आणि आपले उदिष्ट एकच असल्याचे संभाजीराजे म्हणाले होते. संभाजीराजे-मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

राजरत्न आंबेडकर कोण?

राजरत्न आंबेडकर हे उच्चशिक्षित असून बाबासाहेब आंबेडकर यांचे सख्ये बंधू आनंदराज आंबेडकर यांचे पणतू आहेत. प्रकाश आंबेडकर हे राजरत्न यांचे चुलत चुलते आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राजरत्न कार्यरत होते. नुकतीच त्यांनी आरपीआय पक्षाची स्थापना केली असून राजकारणात सक्रिय झाले आहेत.

Rajratna Ambedkar  n manoj jarange patil
Vinay Kore News : जनसुराज्य शक्तीने केला कोल्हापुरातील चार मतदारसंघांवर दावा, महायुतीकडे विनय कोरेंचे साकडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com