Raju Shetti : 1 वाटी आमरस, 1 मोदकाची किंमत दीड कोटी; मात्र शेतकऱ्यांसाठी काय? तटकरेंनी केलेल्या खर्चावर राजू शेट्टी भडकले

Raju Shetti On Mahayuti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी करण्यात आलेल्या मेजवाणीवरून आता जोरदार टीका सुरू झाली आहे.
Raju Shetti
Raju Shettisarkarnama
Published on
Updated on

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त रायगडावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेते उपस्थित होते. तर त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी खास मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या घरी केलं होतं. त्यावरून आता जोरदार टीका होत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

रायगड दौऱ्यानंतर तटकरे यांच्या घरी शाह यांच्यासाठी आमरस आणि मोदकासह खास डिसेश बनवण्यात आल्या होत्या. तसेच मासाहारासह शाकाहारी देखील ठेवण्यात आलं होतं. यानंतर शाह यांच्यासाठी हेलिपॅड बनवण्यावर 1.5 कोटी खर्च करण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केला होता. ज्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू झाली होती.

यानंतर आता एक वाटी आमरस आणि एक मोदक खायला 1.5 कोटी खर्च केला. खास हेलिपॅड बनवले. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे एक दमडीही नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याचे दिसत आहे.

Raju Shetti
Raju Shetti : संजय घाटगेंना भाजपमध्ये घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा विरोध केला बोथट ; राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा

तटकरे यांच्या खास मेजवाणीवरून टीका करताना शेट्टी यांनी, सरकारला लाज वाटत नाही का? हजारो कोटी तिकडे खर्चात करता आपण शेतकऱ्यांसाठी एक रुपयाही देत नाही असे शेट्टी म्हणाले. शाह यांच्यासाठी स्नेहभोजनासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दीड कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. हा आरोप धक्कादायक सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी ट्विट करून टीका केली होती.

शाह रायगडवरील कार्यक्रम आटोपून तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जेवणासाठी गेले. जाताना रायगडावरून 20 किलोमीटर असलेल्या सुतारवाडीत त्याचे हेलिकॉप्टर उतरावे म्हणून 4 युनिटचे हेलिपॅड तयार करण्यात आले. यांच्यासाठी तब्बत 1 कोटी 39 लाख रुपयांचे टेंडर काढत सरकारी तिजोरीतून खर्च केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. याच मुद्द्यावरून आता शेट्टींनी सरकारवर टीका केली.

Raju Shetti
Raju Shetti: मुंबई 'जिंकली'; आता राजू शेट्टी दिल्लीला जाणार; फडणवीस सरकारला चितपट करणार?

1500 रुपये हमी भाव द्यावा

यावेळी शेट्टी यांनी, महायुतीने निवडणूक कालावधीत कर्ज माफीची घोषणा केली. मात्र ती आता हवेतच विरघळली की काय असे म्हणावे लागत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी मदतीची वाट पाहतं असून कांदा उत्पादक मंत्रालयात आंदोलन करत होता. जेलमध्ये गेला पण त्याची दया सरकारला आली नाही. उलट कांद्याचे दर पडल्यावर उशिरा सरकारला शहाणपण आले. कांद्याचे निर्यात शुल्क रद्द केले. पण यामुळे काहीच फरक पडला नसून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याला सरकार जबाबदार असून सरकारनं कांद्याला 1500 रुपये हमी भाव द्यावा. सरसकट हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com