Mahadevi Elephant Case : 'महादेवी'ला  'वनतारा'ला पाठवण्यासाठी दोन कोटींची ऑफर..., राजू शेट्टींनी 'पेटा'च्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं

Mahadevi Elephant PETA Raju Shetti : राजू शेट्टी यांनी वनतारामध्ये पायाला साखळदंड बांधलेल्या हत्तीचे फोटे शेअर करत पेटावर निशाणा साधला आहे.
Mahadevi Elephant Case  Raju Shetti
Mahadevi Elephant Case Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Raju Shetti News : कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्राणी कल्याण प्रकल्पात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे राजकारण पेटले आहे. नांदमी ग्रामस्थ एकवटले असून जिओवर बहिष्कार घालत आहेत. पेटाने पुढाकर घेत महादेवीला वनतारामध्ये हलवले. त्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच वर्षांपूर्वीच फोटो दाखवत गंभीर आरोप केला आहे.

राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, 'पेटा'च्या पदाधिकारी खुशबू गुप्ता यांनी माझी 2020 साली माझ्या जयसिंगपूर येथील कार्यालयात येऊन भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी नांदणी मठाचे भट्टारक महाराज आणि विश्वस्त यांची समजूत घाला व माधुरी (महादेवी) हत्ती अंबानी यांच्या नव्याने होत असलेल्या वनतारा या खासगी प्राणि संग्रहालयात पाठवून द्या अशी विनंती केली.

'या हत्तीच्या बदल्यात अंबानी उद्योग समुहाकडून २ कोटी रूपयाची देणगी नांदणी मठास देण्याचा प्रस्ताव त्यांनी मला दिला. भट्टारक महाराज व विश्वस्त यांच्याशी चर्चाही न करता तो प्रस्ताव मी फेटाळून लावला अखेर पेटाने खोटे आरोप व चुकीचे कागदपत्रे तयार करून माधुरी हत्तीला घेऊन गेले. पण माधुरीला परत आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.', असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Mahadevi Elephant Case  Raju Shetti
Mahadevi Elephant Case: कोल्हापूरकरांच्या दबावापुढे 'वनतारा' प्रशासन झुकलं : खासदार माने अन् महाडिकांचे शिष्टाईचे प्रयत्न सुरु

वनतारातील 'तो' फोटो दाखवला

नांदणी मठामध्ये माधुरी (महादेवी) हत्ती ३३ वर्षे साखळदंडाने बांधून सदर हत्तीच्या पायाला जखमा झाल्या असल्याचा आरोप पेटाने केला आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी वनतारामध्ये पायाला साखळदंड बांधलेल्या हत्तीचे फोटे शेअर करत म्हटले आहे की, अंबानीच्या वनतारा येथे हत्तीच्या पायाला बांधून ठेवण्यात आलेले आहे. मग हे हत्ती कसे मुक्त संचार करतात याचा खुलासा पेटाने करावा त्याचबरोबर वनतारामधील हत्ती अंबानी कुटूंबाच्या कार्यक्रमात राजरोसपणे कोणत्या नियमान्वये वापरले जातात ? याचा खुलासा वनतारामधील अधिका-यांनी नांदणी मठामध्ये करावा , तसेच आजपर्यंत वनतारामध्ये किती प्राणी आले ? किती दगावले ? याचाही लेखा-जोखा द्यावा.

Mahadevi Elephant Case  Raju Shetti
Prakash Ambedkar : '...तर RSS अन् कोणत्याही ब्राम्हणाला दोषी ठरवले जाणार नाही', प्रकाश आंबेडकरांचा 'मालेगाव' निकालावर गंभीर सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com