Raju Shetti : "केंद्र सरकारने कांदा उत्पादकांची जाणीवपूर्वक कोंडी केली? कांदा उत्पादकांना संकटात लोटले"

Raju Shetti made serious allegations on central government : केंद्र शासनाने कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात विलंब केल्याने आता शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी टीका केली आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Raju Shetti News : केंद्र शासनाने कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात विलंब केला. त्यामुळे सध्या केंद्राच्या या निर्णयानंतरही कांद्याचे दर गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

तसेच केंद्राला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना सरकारने जाणीवपूर्वक निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय उशिरा घेतला. त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान करायचे होते, असा संशय आता येत असल्याच्या दावाही शेट्टी यांनी यावेळी केला आहे.

सध्या कांद्याला जो दर मिळत आहे, त्यात उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या अडचणीच्या काळात कोणीही त्याच्या मदतीला नाही राज्य आणि केंद्रातील भाजपच्या सरकारने त्याकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. कांद्याचे दर पडल्यावर त्यात सुधारणा करणे ही केंद्र शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वेळेच पावले उचलणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही, अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली.

केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीचे शुल्क फार आधीच मागे घेणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर निर्यातीला प्रोत्साहन मिळाले असते. कांद्याचे दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटल वाढले असते. केंद्र सरकारला याची कल्पना होती. कारण कांद्याचे उत्पादना अचानक वाढलेले नाही. तीन महिने आधीच याचा अंदाज आलेला होता. मध्य प्रदेशात कांद्याचे उत्पादन वाढत होते.

Raju Shetti
Raju Shetty On Manikrao Kokate : तर कोकाटे यांच्याही जमिनीचा व मालमत्तेचा लिलाव झाला पाहीजे, राजू शेट्टी कडाडले

अशा स्थितीत कांद्याला हमीभाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत राज्य शासनाने पावले न उचलल्यास त्यांच्या मानगुटीवर बसून हा निर्णय घेण्यास भाग पाडू, असेही शेट्टी म्हणाले.

नाफेड मार्फत कांदा खरेदी हा सत्ताधारी पक्षाचा कावेबाजपणा आहे. या माध्यमातून भाजपशी संबंधित नेत्यांचे खिशात भरण्यासाठी हे काम होत आहे ना फेडणे थेट बाजारातून खरेदी करण्याची गरज आहे. तसे न करता मध्यस्थांमार्फत खरेदी का होत आहे, असा गंभीर प्रश्न शेट्टी यांनी केला.

Raju Shetti
Raju Shetti : 1 वाटी आमरस, 1 मोदकाची किंमत दीड कोटी; मात्र शेतकऱ्यांसाठी काय? तटकरेंनी केलेल्या खर्चावर राजू शेट्टी भडकले

बोगस फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्या स्थापन करायच्या आणि त्या मार्फत कांदा खरेदी करून भ्रष्टाचार करायचा हा नाफेड आणि संबंधित संस्थांचा डाव आहे. हाच कांदा पुन्हा बाजारात आणून नाफेड कांद्याचे दर पाडते, असा आरोप शेट्टी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com