Raksha Bandhan 2025: कोरे कोरे छान बँकबुकचे पान, हप्त्याचा योग दादा जुळवून आण!

Ladki Bahin Yojana Scheme Payment Delay :मंडळी, आजच रक्षाबंधन आहे. लाडकी बहीण योजनेच्या बळावर महायुतीला निवडणुकीत मोठे यश मिळून ती राज्यात सत्तेवर आली. सत्तेवर आल्यानंतर मात्र योजनेचे पुढचे हप्ते मिळण्यास उशीर होतो. हप्त्यांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणी रक्षाबंधनानिमित्त जणू या गीतांतून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
Ladki Bahin Yojana Scheme Payment Delay
Ladki Bahin Yojana Scheme Payment DelaySarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

हप्ता योग दादा जुळवून आण

कोरे कोरे छान बँकबुकचे पान

हप्त्याचा योग दादा जुळवून आण

निवडून येताना

बहीण होती लाडकी

निवडून येताच

ठरली की ती दोडकी

सत्तेवर येताच

महायुतीस येई भान

हप्त्याचा योग

दादा जुळवून आण

मोठ्या खर्चामुळे

लागली की वाट

सरकारी तिजोरीत

आता होई खडखडाट

भाऊ झाले बहीण

लाटला की लाभ

सरकारी ओवाळणी

डोक्यालाच ताप

भलत्याच खात्यांवर

आला मोठा ताण

हप्त्याचा योग

दादा जुळवून आण

Ladki Bahin Yojana Scheme Payment Delay
'महादेवी' मुळे चर्चेत आलेल्या 'वनतारा'वर अनंत अंबानी दरवर्षी किती कोटी रुपये खर्च करतात?

मिळवली की सत्ता

तुम्ही मारून थापा

पुरे झाल्या थापा आता

पैसे देऊन टाका

मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे

मोकळे आहे रान

हप्त्याचा योग

दादा जुळवून आण

कोरे कोरे छान

बँकबुकचे पान

हप्त्याचा योग

दादा जुळवून आण

Ladki Bahin Yojana Scheme Payment Delay
RSS Strategy: मोहन भागवतांचं भाषण ऐकण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण; काय आहे संघाचा प्लॅन

तुझ्या गळा, माझ्या गळा...

तुझ्या गळा, माझ्या गळा...

थकीत हप्त्यांच्या माळा

ताई हवा हा हप्ता मला

चल रे दादा चहाटळा !

तुझे खाते, माझे खाते

हप्त्याविना खाते गोते

वेड लागले हो ताईला

म्हणते द्या की ते सारे हप्ते

ओवाळणी ती मिळणार कधी?

विचारू हे आता कोणाला?

पंतांना, दादांना की भाईंना?

सांगते पंतांच्याच स्वारीला!

वर वर अपुले गालि हसू

मनात अपुले रुसू रुसू

कचेऱ्याच्या दारांचे उंबरे

आता तरी किती घासू?

कशी कशी, तशी अशी

गंमत ताईची का करशी !

अता कट्टी फू दादाशी

तर मग गट्टी कोणाशी?

वेड्या बहिणीची वेडी आशा

सोनियाच्या ताटी

उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया रे

लाडक्या बहिणीची रे

वेडी ही आशा ।।धृ।।

माया सरकारची

पृथ्वीमोलाची

कृपा ती सगळी

बाई ‘देवेंद्रा’ची

जणू कृष्ण द्रौपदीला

सखा रे भेटला

पाठीशी राहू दे छाया रे

तशी पाठीशी राहू दे छाया रे ।।१।।

नको भाऊबीज,

नको रक्षाबंधन

पाळा हप्त्याचे आवर्तन

किती उपेक्षा लिहिली भाळी

अपेक्षेने मी ओवाळी

पैसे जेव्हा जमा खात्यावर

जणू नक्षत्रांच्या सरी भूमिवर

पसरी पदर भेट घ्याया रे

पाठीशी राहू दे छाया रे

तशी पाठीशी राहू दे छाया रे ।।२।

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com