Ramdas Athawale : ...म्हणून महायुतीमध्ये 'RPI' नाराज; आठवलेंनी घेतली फडणवीसांची भेट!

Ramdas Athawale meets Devendra Fadnavis : जाणून घ्या, भेटीनंतर आठवलेंनी नेमकं काय सांगितलं आहे? , फडणवीसांनी काय शब्द दिलेला आहे तेही सांगितलं आहे.
Ramdas Athawale meets Devendra Fadnavis
Ramdas Athawale meets Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षाला एकही जागा जाहीर करण्यात आली नाही.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आरपीआयला पाच जागा हव्या असल्याचे पत्र दिले आहे. आम्ही 2012 पासून भाजपसोबत आलो पण आज आरपीआय कुठे दिसत नाही. मी त्यांचेकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज मुंबईत भेट घेऊन जागावाटपावर चर्चा केली.रिपब्लिकन पक्ष राज्यात प्रमुख पक्ष असून जागावाटप बाबत रिपब्लिकन कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले. असं ट्वीटही आठवलेंनी केलं आहे.

Ramdas Athawale meets Devendra Fadnavis
Mahayuti : गेवराईतून महायुतीची उमेदवारी विजयसिंह पंडितांना; आष्टी, बीडच्या निर्णयाकडे लक्ष!

आठवलेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगतिले की, त्यांच्या पक्षाला महायुतीमध्ये एकही जागा मिळत नाही. त्यांना महायुतीच्या कोणत्याही बैठकीसही बोलावलं गेलं नाही. आम्हाल चार ते पाच जागांची अपेक्षा होती. तसेच त्यांनीह हेही सांगितले की, फडणवीसांनी त्यांच्या पक्षाला निवडणुकीत दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते.

Ramdas Athawale meets Devendra Fadnavis
Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं ‘कल्याण’ कधी होणार? जागावाटपावरून सामूहिक राजीनामे

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आठवलेंनी (Ramdas Athawale) म्हटले की, रिपब्लिकन पार्टी एनडीए आणि महायुतीच्या सोबत आहे. परंतु महायुतीच्या कोणत्याही बैठकीत आम्हाला बोलावलं गेलं नाही. आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला किमान चार ते पाच जागा मिळतील, परंतु दिल्या गेल्या नाहीत. आम्ही महायुतीसोबत आहोत परंतु महायुतीनेही आमचा सन्मान करायला हवा.

रामदास आठवलेंनी सांगितले की, आमची मागणी आहे की आम्हाला कमीत कमी दोन जागा मिळायला हव्यात. आम्हाला विश्वास दिला गेला की, दोन जागा मिळतील. रिपब्लिकन पक्षाला जर एकही जागा मिळाली नाही तर, हा आमच्या समजारसोबतचा धोका असेल. सरकार आल्यानंतर आम्हाला एक मंत्रीपद मिळेल असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे आणि सांगितले आहे की आम्हाला एख विधानपरिषदेची जागाही दिली जाईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com