Mahayuti : गेवराईतून महायुतीची उमेदवारी विजयसिंह पंडितांना; आष्टी, बीडच्या निर्णयाकडे लक्ष!

Beed Vidhan Sabha: महायुतीत शिवसेनेच्या बीडच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. दोन्ही पक्षांच्या ओढाताणीत बीडचाही निर्णय रखडलेलाच आहे.
Beed
BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed News: महायुतीकडून गेवराई विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना मिळाली आहे. मात्र, आष्टी व बीड मतदार संघाचा पेच अद्याप कायमच आहे.

आष्टीत राष्ट्रवादीकडून आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासह भाजपचे माजी आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे उमेदवारीची वाट पाहत आहेत. तर, बीडमधून उमेदवारीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप प्रयत्नशील आहेत.

महायुतीत भाजपने (BJP) केजमधून नमिता मुंदडा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने परळीतून पालकमंत्री धनंजय मुंडे व माजलगावमधून आमदार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार पक्षापासून दुरावल्याने ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार हे निश्‍चित मानले जात होते.

Beed
Pathri Assembly Constituency: जरांगे पाटलांचा आदेश पाळणार, 26 इच्छुकांनी हातात ज्वारी घेऊन शपथ घेतली

रविवारी येथून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्या बदल्यात आष्टीची जागा भाजपला सोडण्याबाबच्या चर्चेला अद्याप अंतिम रुप आलेले नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) बाळासाहेब आजबे आमदार आहेत. मात्र, त्यांची उमेदवारी काटून ही जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपला सोडून घेण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशिल आहेत.

Beed
Aurangabad West Assembly: लोकसभेत `जरांगे फॅक्टर` चालला, विधानसभेसाठी उमेदवारांची अंतरवालीकडे धाव

तर, याच पक्षाचे माजी आमदार भिमराव धोंडे यांनीही अगोदरच उमेदवारी अर्ज भरुन टाकला आहे. आता या जागेचा तिढा कसा सुटतो आणि उमेदवारी कोणाला मिळते, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. तर, महायुतीत शिवसेनेच्या बीडच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे.

दोन्ही पक्षांच्या ओढाताणीत बीडचाही निर्णय रखडलेलाच आहे. शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख अनिल जगताप, बाजीराव चव्हाण, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. येागेश क्षीरसागर, तय्यब शेख, फारुक पटेल यांचे समर्थक फटाके घेऊन तयार आहेत. मात्र, जागेचाही घोळ आणि उमेदवारीची घोषणा बाकी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com