Ramdas Athawale: मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा पक्ष नाराज : 12 वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा न दिल्याची खदखद; काँग्रेसने दिलेल्या सन्मानाची सांगितली आठवण

RPI chief Ramdas Athawale expressed dissatisfaction over political representation: रामदास आठवले यांनी भाजपसोबतच्या दीर्घ युतीनंतर रिपाइंला सत्तेत अपेक्षित वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. विधान परिषदेसह राजकीय प्रतिनिधित्वाच्या संधींबाबत त्यांनी मागणी मांडली आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ramdas Athawale News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गेल्या बारा वर्षांपासून भाजपसोबत युतीचे राजकारण केले. मात्र, या दीर्घ राजकीय प्रवासात पक्षाला सत्तेत अपेक्षित वाटा मिळाला नाही. पक्षाला एकही विधान परिषद सदस्य मिळू शकला नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आंबेडकरी चळवळीतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष आज सत्तेच्या समीकरणात सहभागी असला, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना अपेक्षित राजकीय ताकद मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘सत्तेत सहभाग असूनही आठवले गटाच्या रिपाइंला राजकारणात काय मिळाले’ हा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.

रिपाइंची ओळख आंबेडकरी चळवळीशी जोडली आहे. मात्र, दीर्घकाळ सत्ताधारी आघाडीसोबत राहिल्याने पक्षाच्या आठवले गटाची स्वतंत्र आंबेडकरी राजकीय भूमिका संपली आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. यामुळे पक्षाची आंबेडकरी समाजातील विश्वासार्हता कमी होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. केवळ सत्तेतील सहभागापेक्षा समाजाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आणि चळवळीशी नाते मजबूत करणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरात होत असलेल्या आंदोलनांकडे रिपाइंने स्वतंत्रपणे पाहण्याची वेळ आली आहे.

Ramdas Athawale
Ravindra Deshmukh: जिल्हा बँकेत ज्यांच्यासाठी ताकद लावली, त्यांचीच माघार : काँग्रेस आमदाराची गोची; ऐनवेळी दुसऱ्या नेत्याला आयात करण्याची वेळ

काँग्रेसच्या काळात मिळाला सत्तेत सहभाग

आठवले काँग्रेससोबत असताना सत्तेतील वाटा सहज मिळत होता. आठवलेंच्या रिपाइंतून टी. एम. कांबळे, सुमंतराव गायकवाड, प्रीतमकुमार शेगावकर, दयानंद मस्के यांच्यासह विदर्भातील अनिल गोंडाने यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती, तर चंद्रकांत हंडोरे यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते, हा इतिहास कार्यकर्त्यांनी सांगितला.

Ramdas Athawale
Someshwar election : सोमेश्वरच्या निवडणुकीत 'पोस्टर वॉर'; सोशल मीडियातील ‘पश्चिमेचा कटप्पा’ने राजकारण तापलं...

आता निर्णय घेण्याची वेळ

कार्यकर्ता म्हणून कारकीर्द सुरू करणारे रामदास आठवले यांनी रिपाइं नेते अशी प्रतिमा निर्माण केली. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला राजकीय निर्णय ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. परंतु, आज पुन्हा आंबेडकरी चळवळीशी जुळण्यासाठी पुन्हा एकदा ‘टर्निंग पॉइंट’चा विचार करावा अशी जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सत्तेतील सहभाग आणि आंबेडकरी चळवळीशी असलेली बांधिलकी यात समतोल साधणे रिपाइंसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. सत्तेत सहभाग मिळत नाही. यामुळे पदापेक्षा समाजाच्या प्रश्नांवर भूमिका घेण्याची वेळ आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा पक्षाच्या व्यापक राजकीय पुनर्बांधणीसाठी वापर होणे आवश्‍यक आहे. असे रिपाइंचे मीडिया प्रभारी राजन वाघमारे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com