
Maharashtra Politics : हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या समर्थनात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्रित विजयी मेळावा घेऊन एकजूट दाखवली. आजच्या मेळाव्याची चर्चा देशभरात सुरू आहे. याचे राजकीय पडसादही उमटायला लागले आहे. प्रत्येक जण ठाकरे बंधु एकत्र येण्याचा आणि आजच्या विजयी मेळाव्याचा आपापल्या परीने अर्थ लावत आहे. रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या मेळाव्यावर भाष्य केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोणी मतं देत नाहीत, तर उद्धव ठाकरे यांना या आधीच एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. दोन भाऊ एकत्र आले, त्यांचे स्वागत आहे. पण याचा राज्यात महायुतीलाच फायदा होईल, असा दावा आठवले (Ramdas Athwale) यांनी केला. तसेच आपणही प्रकाश आंबेडकर यांना ऐक्यासाठी साद घातली होती, मात्र ते निगेटीव्ह आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वीस वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा आनंद आहे, मात्र याचा महायुतीला जास्त फायदा होईल, महाविकास आघाडीत फूट होऊन तिसरा गट निर्माण होईल. आम्ही सुद्धा मराठीप्रेमी आहोत, विजयी मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार नाही. (Raj Thackeray) मुंबईत नॉन मराठी लोक जास्त आहेत. बाहेरून आलेल्या लोकांनी उद्योग धंदे टाकले म्हणून इथे विकास झाला. मराठी लोकांसोबतच बाहेरच्या लोकांचेही राज्याच्या आणि मुंबईच्या विकासात योगदान आहे.
लहान मुलांना हिंदी शिकवणे योग्य नव्हते, त्यामुळे मराठी माणसांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भातला जीआर रद्द केला. सिहांसन खाली करो, या संजय राऊत यांच्या विधानाची आठवले यांनी खिल्ली उडवली. खुर्च्या खाली करा हे म्हणण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही , जनता सांगेल. निवडणूक लढा आणि सिहांसन घ्या. राज ठाकरेंना मतं भेटत नाहीत, उद्धव ठाकरेंना शिंदेंनी धक्का दिला आहे, असेही आठवले म्हणाले.
चार लोकं जाऊन एखाद्या अमराठी माणसाच्या थोबाडीत मारतात जर हिमंत असेल तर पाकिस्तानच्या थोबाडीत जाऊन मारा, असेही आठवले म्हणाले. ठाकरे बंधु एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ऐक्याची हाक देत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना साद घातली.
मी प्रकाश आंबेडक यांना साद दिली, मात्र ते ऐक्यसाठी निगेटिव्ह आहेत. बाळासाहेब जर सोबत आले तर माझं केंद्रातलं मंत्रिपद मी त्यांना द्यायला तयार आहे. समाजासाठी एकत्र आले पाहिजे, तर ताकद वाढेल. मी चार पावल मागे यायला तयार आहे, याचा पुनरुच्चार आठवले यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.