Nagpur Polling : उन्हाचा चटका, नागपूर, रामटेक येथे मतदानाची टक्केवारी घसरली !

Polling Percentage : राज्यात नागपूर आणि रामटेक मतदारसंघात मतदानाची टक्केवारी दुपारी एक वाजता घसरल्याचे चित्र होते. राज्यातील पाचही लोकसभा मतदारसंघांचे विधानसभा क्षेत्रनिहाय मतदानाची टक्केवारी 'सरकारनामा' च्या हाती लागली आहे.
Youth Voting In Vidharbha
Youth Voting In VidharbhaSarkarnama

Lok Sabha Election 2024 : राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी घसरल्याचे चित्र आहे. पाच ही लोकसभा मतदारसंघात सरासरी 32.36 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. नागपूर येथे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ 27.75 टक्के तर रामटेक मतदारसंघात 28.73 टक्के मतदान झाले आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 34.56 टक्के, तर चंद्रपूर मतदारसंघात 30.96 टक्के, गडचिरोली चिमुर मतदारसंघात 41.01 टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत झाले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी एकूण 28.75 टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 32 टक्के, नागपूर दक्षिण 31.89 टक्के, नागपूर पूर्व 31.30 टक्के, नागपूर मध्य 28.42 टक्के, नागपूर पश्चिम 30.5 टक्के, नागपूर उत्तर 31.89 टक्के मतदान झाले आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Youth Voting In Vidharbha
Aaditya Thackeray News : 'महाराष्ट्रात मोदी नाही ठाकरे गॅरंटी चालते', आदित्य ठाकरेंनी सुनावले

रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. रामटेक 32.81टक्के, यात काटोल 29.18 टक्के, सावनेर 29.39 टक्के, हिंगणा 23.60 टक्के, उमरेड 32.97 टक्के, कामठी 27.57 टक्के मतदान झाले आहे.

गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव 48.65 टक्के, आरमोरी 38.08 टक्के, गडचिरोली 46.30 टक्के, अहेरी 40.63 टक्के, ब्रहपुरी 35.37 टक्के आणि चिमूर 35.59 टक्के मतदान झाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर 28.31 टक्के, राजुरा 32.63 टक्के , बल्लारपूर 31.50 टक्के , वरोरा 32.02 टक्के, वणी 30.37टक्के, आर्णी 31.42 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर 31.86 टक्के , भंडारा 31.38 टक्के, साकोली 32.99 टक्के, अर्जुनी मोरगाव 49.17 टक्के, तिरोडा 31.68 टक्के, गोंदिया 33.15 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.

R

Youth Voting In Vidharbha
Sanjay Raut: राऊतांनी राणांना पुन्हा हिणवलं; नटीला नटी नाही तर काय म्हणणार? गणपत पाटलांना प्रेमाने नाच्या म्हणतोच की...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com