Raosaheb Danve News : जालन्याचा निकाल बाकी, पण दानवेंची फिल्डिंग आधीच तयार; शिवसेनेला 'मैत्री'ची खुली ऑफर!

Raosaheb Danve Shiv Sena alliance : जालना विधानसभा निवडणुकीचा निकाल बाकी असतानाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला मैत्रीची खुली ऑफर दिली आहे.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

BJP News : जालना महापालिका निवडणुकीसाठी अजून मतदान होऊन निकाल जाहीर व्हायचा आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी या निवडणुकीत युतीऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बाजूंनी प्रचारात जोर लावण्यात आला. आता उद्या परीक्षा असतानाच काल जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. मराठवाड्यातील ज्या चार जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे. त्यात जालन्याचा समावेश नाही. ही निवडणुक दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. तरीही महापालिका निवडणुकीतील स्वबळाचा निकाल लागण्याआधीच भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हा परिषदेत युतीसाठी शिवसेनेसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.

महापालिका निवडणुकीत आम्ही युतीसाठी प्रयत्न केले. पण काही जागांवर आमच्यातील मतभेद दूर होऊ शकले नाही, म्हणून आम्ही स्वबळावर लढतो आहोत. पण याचा अर्थ आम्ही एकत्र येणारच नाही असा होत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत आमची युती होऊ शकते. आम्ही एकत्र बसू आणि या संदर्भात निश्चित चर्चा करू, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. महापालिकेत युती व्हावी यासाठी आमच्यात अनेक बैठका झाल्या. पण एकमेकांच्या जागांवर दावे केले गेल्यामुळे एकमत होऊ शकले नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

Raosaheb Danve
PMC Nivadnuk: पुण्यात निवडणुकीत पैशांचा पाऊस! आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च

महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका सुरवातीपासून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची होती. परंतु राज्य पातळीवर महापालिकेत युती करा, असे आदेश आल्यानंतर युतीसाठी मॅरेथाॅन बैठका पार पडल्या. पण शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांच्या अशा जागांवर दावा केला, जेणेकरून युतीचे घोडे पुढे जाऊच नये. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेचे गु्ऱ्हाळ सुरू होते.

शेवटी दोन्ही पक्षांनी आपापल्या इच्छूक उमेदवारांना एबी फाॅर्मचे वाटप केले आणि स्वबळावर मैदानात उतरले. महापालिका निवडणुकीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेचा भडीमार, श्रेयवादाची लढाई आणि आरोप-प्रत्यारोप झाले. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर 16 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. जालना महापालिकेत पहिला महापौर कोणाचा होणार? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष आणि दानवे-खोतकर-गोरंट्याल या त्रिमुर्तींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Raosaheb Danve
Municipal Corporation Election : स्वबळावर लढणाऱ्या राजकीय पक्षांची ताकद दिसणार, संभाजीनगरमध्ये खान-बाण-की भगव्याची शान?

अशातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालाची वाट न पाहताच रावसाहबे दानवे यांनी जिल्हा परिषदेत शिवसेनेसोबत युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. महापालिकेत युती झाली नसली तरी ती जिल्हा परिषदेत होऊ शकते, यासाठी आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेकडून मात्र दानवे यांच्या या पुढाकारावर प्रतिक्रिया आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com