
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील झोपडीधारकांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले आहे. आता झोपडी पाडल्यापासून अवघ्या पाच वर्षांत मिळणारे नवे घर विकता येणार आहे. पूर्वी हा कालावधी दहा वर्षे होता. तसेच, राज्यात २०११ नंतर बांधलेल्या झोपड्यांनाही आता संरक्षण मिळणार आहे. अवघ्या अडीच लाखांत या झोपडीधारकांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. (Rehabilitated house can be sold in five years : Jitendra Awhad)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुमतीने राज्य मंत्रिमंडळाने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त केलेल्या समितीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे ऐन दिवाळीत झोपडीधारकांना गुड न्यूज मिळाली आहे.
गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी सहा महिन्यांपूर्वी एका पत्रकार परिषदेत पुनर्विकास योजनेत समाविष्ट असलेल्या झोपड्या निष्कासनानंतर पाच वर्षांत विकण्याची मुभा देण्याबाबत सूतोवाच केले होते. त्यांनी मांडलेल्या या विषयाला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. झोपडीधारकांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अलसंख्याक मंत्री नवाब मलिक, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश होता.
गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेऊन झोपडीधारकांना दिवाळी भेट दिली आहे. या आधी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाल्यानंतर ती विकण्यासाठी दहा वर्षांची वाट पहावी लागत असे. म्हणजे एखादी झोपडी पुनर्वसनास पात्र ठरल्यानंतर ती पाडण्यात येत असे. त्यानंतर त्या जागेवर इमारती उभारली जायची आणि त्यातील घरे संबंधित झोपडीधारकांना मिळाल्यानंतर दहा वर्षांनी विकता येत होते. नव्या नियमांमुळे आता झोपडीधारकांना दिला मिळाला आहे.
आता एखादी झोपडी पुनर्वसनास पात्र ठरल्यानंतर ती पाडलेल्या दिवसांपासून पाच वर्षांतच झोपडीधारकांना आपले घर विकण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तर, या आधीच २०११ नंतर बांधलेल्या झोपड्यांना पैसे भरून पक्के घर देण्याचा कायदा आहे. त्यासाठी आता केवळ अडीच लाख रूपये भरून घर मिळणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे गोरगरीब झोपडीधारकांच्या अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.