Tension in Nagpur : नागपूरमधील महाल भागात दोन समाजाच्या गटातील तरुणांमध्ये दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटांमध्ये एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी प्रचंड तणाव आहे. पोलिसांनी अश्रुधराच्या नळकांड्या फोडल्या. क्रेन आणि काही वाहनांनी जाळपोळ करण्यात आली.
दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर उघडून टाकण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात विशिष्ट समाजाविरोधात त्यांनी घोषणाबाजी केल्याचा दावा काही तरुणांनी केला. याविषयी त्यांनी पोलिसांना देखील सांगितल्याची माहिती आहे. मात्र, दुपारी हे प्रकरण पोलिसांनी मिटवले. मात्र, सायंकाळी दोन्ही गट समोरासमोर आले.
दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी नंतर दोन्ही गट आक्रमक झाले. त्यानंतर दगडफेक करण्यात आली. स्थानिक राजकीय नेत्यांकडून 100 गाड्या जाळल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.दगडफेकीत अग्नीशमन दलाचे जवान देखील जखमी झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनवी शांततेचे आवाहन केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.