Pratap Sarnaik News : संजय गायकवाड, मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडला आहे. मुलाने आयोजित केलेल्या गोविंदा लीगमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अडचण वाढण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्र्यांनी फिल्मी स्टाईने रॅपिडो (बाईक टॅक्सी) बूक केली होती. अनधिकृत असताना रॅपिडो धावत असल्याचे परिवहन मंत्र्यांनीच उघड करत कारवाईचे संकेत दिले होते. मात्र, ज्या रॅपिडोवर कारवाईचे संकेत दिले होते त्याच कंपनीकडून परिवहन मंत्र्याचा मुलगा विहंग सरनाईक याने स्पॉन्सरशीप घेतली आहे.
गोविंदा लिगच्या उद्घाटनासाठी प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यामुळे परिवहन मंत्र्यांचा डबल धमाका रॅपिडो बाईक आली..त्याला खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी ’रॅपिड’ भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशीप मिळाली, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी प्रो गोविंदा लीगचा स्पाॅन्सर रॅपिडो असलेला फोटो देखील ट्विट केला आहे.
यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतंय, हे स्पष्ट होतं! पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रिपदाचा गैरवापर तर नाही ना? असा सवाल रोहित पवार यांनी करत ब्लॅकमेल सरकार असा हॅशटॅग वापरला आहे.
बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी परिवहन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, परिवहन मंत्र्यांनी रॅपिडोला रंगेहात पकडले आणि दुसऱ्या दिवशी मुलाच्या गोविंद लीगला रेपिडोने स्पाॅन्सरशिप दिली. सरनाईक ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या सचिवांनी रॅपिडोवर सहा एफआयआर दाखल केल्या आहेत. तरी सुद्धा रंगहात पकडल्याचे दाखवत स्पाॅन्सरशिप घेत असतील तर हा सरळ भ्रष्टाचार आहे. आम्ही त्याचा निषेध करतो.
केशव क्षीरसागर यांनी सांगितले की, कॅब व रिक्षा चालकांचा तोडगा काढण्याऐवजी एक नवीन ॲप परदेशी खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आधी ई बाईक टॅक्सी धोरण आणण्यासाठी आग्रही असणारे परिवहन मंत्री आता त्या ॲपच्या माध्यमातून बाईक टॅक्सी सुद्धा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.