Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाडांवर हल्ला; शरद पवारांचे शिलेदार प्रचंड आक्रमक, सरकारचा सहभाग असल्याचा थेट आरोप

Rohit Pawar Supriya Sule Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'ज्यांनी हल्ला केला त्यांचे फोटो कोणासोबत आहेत ते पाहा. त्यामुळे हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा मी आरोप करतोय. जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो.
NCP Sharad pawar on Pravin Gaikwad Attack
Pravin Gaikwad Attacksarkarnama
Published on
Updated on

Pravin Gaikwad Attack : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड हे अक्कलकोटला सत्कारसभारंभासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करत शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांच्यासह सात जणांवर अक्कलकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप करण्या येत आहे. तसेच त्याचे भाजपच्या मंत्र्यासोबत फोटो देखील समोर आले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्ला बोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'ज्यांनी हल्ला केला त्यांचे फोटो कोणासोबत आहेत ते पाहा. त्यामुळे हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा मी आरोप करतोय. जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी आता बोलायचच नाही,त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही,यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे.पण प्रवीण दादा आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत.'

रोहित पवार यांनी देखील ट्विट करत गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रविणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा.

NCP Sharad pawar on Pravin Gaikwad Attack
Sangram Jagtap: अजितदादांच्या आमदारानं हाती घेतला ‘हिंदुत्वाचा भगवा’ ; भाजपवासी होणार?

कठोर कारवाईची मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे.

NCP Sharad pawar on Pravin Gaikwad Attack
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी 'मास्टर प्लॅन'! विधानसभेसाठी वापरलेला 'तो' डाव भाजप टाकणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com