Political ruckus Vidhan Bhavan: विधानभवन परिसरात राडा; आव्हाड, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; म्हणाले...

Political News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
jitendra Avhad, devendra fadnavis
jitendra Avhad, devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानभवनाच्या लॉबीमध्ये माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरा-समोर आले. त्यानंतर लॉबीमध्येच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करीत कपडे फाडली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ झाला. हा प्रकार गुरुवारी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडला. या सर्व प्रकाराचे पडसाद विधिमंडळात उमटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. विधानभवन परिसरात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे.

विधानभवनाच्या लॉबीमधील दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यावेळी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. विधानभवनाच्या प्रांगणात सर्वसामान्यांना पासशिवाय सोडले जात नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्या ठिकाणी कसे आले? हा प्रश्न विचारला जात आहे. या लोकांना ज्यांनी पास दिले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

jitendra Avhad, devendra fadnavis
Devendra Fadnavis: काँग्रेसच्या दाव्याला सुरुंग : विरोधी पक्षनेतेपदासाठी फडणवीसांनी 'अनिल परबांना' तयार केलं?

दरम्यान, आव्हाड विरुद्ध पडळकर हा वाद विधानभवनापर्यंत पोहोचला आहे. विधान भवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही समर्थकांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, यामध्ये एकमेकांचे कपडे देखील फाडले आहेत. या प्रकारामुळं विधानभवनाचं पावित्रच भंग झाले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी याचा रिपोर्ट मागवला असून त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

jitendra Avhad, devendra fadnavis
MNS Shivsena UBT Alliance : ठाकरेंच्या एकीची विरोधकांना धास्ती, पण राज यांची उद्धव ठाकरेंना टाळी द्यायला टाळाटाळ

या, घटनेनंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad), जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानभवन परिसरात येऊन हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर कारवाई करतील, असे आश्वासन दिले आहे.

jitendra Avhad, devendra fadnavis
BJP Politics: स्थानिक नेत्यांना पक्षात घेण्याचा भाजपचा सपाटा; कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदुत्ववादी प्रतिमा उजळविणार

दरम्यान, या सर्व घटनेनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारताच गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला काहीही माहिती नाही. नेमकं काय झालंय हे आपण पाहिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

jitendra Avhad, devendra fadnavis
Uddhav Thackeray Politics : राज ठाकरे गाजवून गेले, आता उद्धव ठाकरे गाजवणार नाशिकचं मैदान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com