Rupali Chakankar Resignation : रुपाली चाकणकरांचा राजीनामा नव्हे हकालपट्टी! राष्ट्रवादीचे नेते गप्प बसले अन् सुत्र फिरली...

Rupali Chakankar Resignation Inside Story : रुपाली चाकणकर यांनी वैयक्तिक कारण देत महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Ruapali Chakankar Resigns
Ruapali Chakankar Resignssarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. खरात हा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा गुरु असल्याचे अनेक व्हिडिओ देखील समोर येत होते. त्यामुळे चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, त्यांच्याकडून या प्रकरणात वेळ काढूपणा करण्यात येत होता.

विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपमधील नेते देखील रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नव्हते. अखेर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कारवाई करू असे सांगितले मात्र राजीनाम्यामध्ये स्पष्ट संकेत दिले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून पक्ष एक दोन दिवसांमध्ये कारवाई करेल, असे सांगितले. त्यामुळे रुपाली चाकणकर या राजीनामा देणार की नाही हे स्पष्ट होत नव्हते. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकर यांना भेटीसाठी बोलवले आणि स्पष्ट शब्दात राजीनामा द्या अन्यथा तुम्हाला बडतर्फ करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

Ruapali Chakankar Resigns
Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांनी स्वत:चे बोट कापले, सुषमा अंधारेंनी दाखवले भयंकर फोटो ; अटक करुन नार्को टेस्टची मागणी

चाकणकरांच्या अटकेची मागणी

रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. अंधारे यांनी म्हटले की, चाकणकरबाई डायलॉगबाजी करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्यावर जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा आधी विचार करा.

Ruapali Chakankar Resigns
Rupali Chakankar Resignation : 'नीच,नीच वृत्तीची बाई..',चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली पाटलांनी 'तो' फोटो दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com