

Rupali Patil News : अशोक खरात प्रकरणात टिका होत असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. दरम्यान, राजीनाम्यानंतर देखील रुपाली पाटील यांच्याकडून चाकणकर यांना टार्गेट करण्यात आले.
रुपाली पाटील यांनी फेसबूकवर रुपाली चाकणकर राजीनामा देत असलेला फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'नीच,नीच वृत्तीची बाई म्हणते वैयक्तिक कारणाने राजीनामा देत आहे,वैयक्तिक कारणाने तेही हसत हसत.व्वा भाई व्वा.अगं लाज वाटली पाहिजे इथे महाराष्ट्र आया भगिनीच्या सुरक्षेसाठी लढतात आणि ही हसत राजीनामा देते.'
राजीनामा झाल्याने आता रुपाली चाकणकर व भोंदू बाबा महिला अत्याचारात सहभागी असलेल्या लोकांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच एका पोस्टमध्ये त्यांनी रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या पायावर डोकं ठेवत असतानाचा फोटो शेअर करत “भोंदू खरात बाबाला आयोगाची साथ, लाज सोडली महिला आयोगाने, तिला द्या लाथ!” असे म्हटले आहे.
रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याने अजितदादा यांना शांती मिळाली असेल.नासवलेला महिला आयोग, कीड लागलेल्या आयोगाचा राजीनामा घेतल्यानेमहाराष्ट्रातील अजितदांच्या बहिणींना सुरक्षित भावना दिल्याने मुख्यमंत्रीसाहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी,उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब धन्यवाद असे देखील रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.