Sakal Newspaper Ranking: देशात 'टॉप टेन मध्ये 'सकाळ'; 'एबीसी'चे शिक्कामोर्तब, महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक

Sakal' in India's Top 10: डिजिटल माध्यमांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता मुद्रित माध्यम असलेल्या वर्तमानपत्रांच्या प्रसारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, मराठी वाचकवर्गाने 'सकाळ' वरील विश्वास कायम ठेवत या दैनिकाला सर्वाधिक खपाचे मराठी वृत्तपत्र हा मान मिळवून दिला आहे.
Sakal' in India's Top 10: ABC Confirms Highest Circulation in Maharashtra
Sakal' in India's Top 10: ABC Confirms Highest Circulation in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Sakal Highest Selling Newspaper: मुद्रित माध्यमामध्ये 'सकाळ' महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. देशातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा वर्तमानपत्रांच्या यादीतही 'सकाळ'ने स्थान पटकाविले आहे.डिजिटल माध्यमामध्ये मराठीतील अव्वल संकेतस्थळ ई-सकाळ डॉट कॉम' आहे आणि टीव्ही माध्यमामध्ये 'साम' मराठी वृत्तवाहिनी मराठी वृत्तवाहिन्यांत पहिल्या तीन क्रमांकांत आहे.

हिंदी भाषेतील दैनिक भास्कर' हे देशातील सर्वाधिक खपाचे वर्तमानपत्र ठरले आहे. देशातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या दहा वर्तमानपत्रांमध्येही 'सकाळ'ने स्थान मिळवत आघाडीचे वर्तमानपत्र म्हणून प्रतिष्ठा कायम राखली आहे. 'टॉप टेन मध्ये मराठीमधील केवळ दैनिक सकाळचा समावेश आहे.

मागील काही वर्षांपासून डिजिटल माध्यमांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता मुद्रित माध्यम असलेल्या वर्तमानपत्रांच्या प्रसारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, मराठी वाचकवर्गाने 'सकाळ' वरील विश्वास कायम ठेवत या दैनिकाला सर्वाधिक खपाचे मराठी वृत्तपत्र हा मान मिळवून दिला आहे.

विश्वासार्ह बातमीदारी आणि वाचकांची आवड लक्षात घेऊन विविध विषयांवरील उपयुक्त माहिती यांमुळे खपाच्या बाबतीत 'सकाळ'ने राज्यात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मराठी वर्तमानपत्रांमध्ये 'सकाळ'चा सर्वाधिक खप झाल्याचे 'एबीसी'च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Sakal' in India's Top 10: ABC Confirms Highest Circulation in Maharashtra
Nepal Interim Government: माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्यावर तरुणाईचा भरोसा: अंतरिम सरकार बनविण्याचा प्रस्ताव

दररोजचा खप

'ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन'ने (एबीसी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत 'सकाळ'चा दररोजचा सरासरी खप ११ लाख ४२ हजार ५७४ एवढा असून, 'लोकमत', 'लोकसत्ता' आणि 'पुढारी' अशी स्पर्धक वर्तमानपत्रे फारच मागे आहेत. वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय इव्हेंट सादर करण्यातही 'सकाळ' अग्रेसर आहे. एकूण सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये 'सकाळ माध्यम समूहा'ला कोट्यवधी वाचक प्रेक्षक आणि वापरकत्यांचे पाठबळ लाभते आहे.

Sakal' in India's Top 10: ABC Confirms Highest Circulation in Maharashtra
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

वैशिष्टयपूर्ण सदरे

वाचकांची आवड लक्षात घेऊन 'सकाळ'कडून दररोज एक पुरवणी प्रसिद्ध केली जाते. या पुरवण्यांमध्ये आरोग्य, महिला, युवक, विद्यार्थी , उद्योजक यांना केंद्रित ठेवून विविध विषयांची मांडणी केली जाते, तसेच 'सप्तरंग सह इतर पुरवण्यांमध्ये साहित्य, राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, मनोरंजन असे विषय हाताळले जातात. मागील वर्षीपासून सुरू झालेली 'डोकंकोड' ही पुरवणीही विद्याथ्यांसह सर्व वयोगटांतील वाचकांच्या आवडीची ठरली आहे. मुख्य अंकात आणि पुरवण्यांमधील वैशिष्टयपूर्ण सदरे, मार्मिक व्यंग्यचित्रे, 'अंतरंग' यामुळे 'सकाळ'कडे वाचकांचा ओढा वाढतच आहे.

  1. दैनिक भास्कर (हिंदी)

  2. दैनिक जागरण (हिंदी)

  3. टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी)

  4. मल्याळम मनोरमा (मल्याळी)

  5. अमर उजाला (हिंदी)

  6. हिंदुस्तान (हिंदी)

  7. राजस्थान पत्रिका (हिंदी)

  8. इनाडू (तेलुगू)

  9. डेली थंथी (तमीळ)

  10.  सकाळ (मराठी)

  • सकाळ : ११ लाख ४२ हजार ५७४

  • लोकमत: ३ लाख ७३ हजार ३५५

  • लोकसत्ता: २ लाख ११ हजार ८८०

  • पुढारी: ५७ हजार ७८४

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com