Sambhaji Raje : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीच्या जाहिरातीवर संभाजीराजे संतापले, म्हणाले 'राजर्षी शाहू महाराजांना...'

Sambhaji Raje Devendra Fadnavis swearing advertisement: राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून आज (गुरुवारी) देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. या शपथविधीच्या निमित्ताने आज सर्वच वर्तमानपत्रांमध्ये शपथविधीची जाहिरात भाजपकडून देण्यात आली आहे.
Sambhaji Raje Devendra Fadnavis swearing advertisement
Sambhaji Raje Devendra Fadnavis swearing advertisementsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून आज (गुरुवारी) देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. या शपथविधीच्या निमित्ताने आज सर्वच वर्तमानपत्रांमध्ये शपथविधीची जाहिरात भाजपकडून देण्यात आली आहे. या जाहिरातीत राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो नसल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट भाजपला सुनावले आहे.

'जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये राजर्षी शाहू, महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी'. अशा शब्दात संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

Sambhaji Raje Devendra Fadnavis swearing advertisement
Devendra Fadnavis : फडणवीसांनी शपथ घेताच 'लाडका' आमदार फेडणार नवस; तुळजापूरची पायी वारी करणार

निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा. पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्राला सुपर पॉवर कसं करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही तितका इतिहास महाराष्ट्राला आहे. यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसं जाता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असेही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.

दिलेली आश्वासनं पाळावीत

केंद्रात आणि राज्यात आता भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक प्राधान्याने करावे. जे जे शब्द दिले होते, ते आता त्यांनी पूर्ण करावेत, असे संभाजीराजे म्हणाले. मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकवणार हे सरकारने सांगावे. ते टिकणार नसेल तर मग मराठा समाजाला कसे आरक्षण देणार हे सांगणे गरजेचे आहे. माझा काही सल्ला मागितला तर याबाबत मी सल्ला द्यायला तयार असल्याचेही संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.

Sambhaji Raje Devendra Fadnavis swearing advertisement
Devendra Fadnavis Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत कोणाला स्थान?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com