
Sambhaji Raje News : मराठा आरक्षण कोर्टात न टिकण्यामागे उद्धव ठाकरे असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वेळी वकील न दिल्यामुळे आरक्षण गेले'.
दोनदा आरक्षण गेल्यामुळे तिसऱ्यांदा कशा पद्धतीने ते कोर्टात टिकेल हे मराठा समाजाला सांगितलं पाहिजे. सगळ्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे पाच वर्षे आहेत तर ताकतीन हा मुद्दा मांडला पाहिजे. आरक्षणाबाबत तुमच्या मनामध्ये काय आहे हे सांगितलं पाहिजे. असे आवाहन संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना केले.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दल बोलताना संभाजीराजे म्हणाले, तिसरी आघाडी चिंतन करूनच आता पुढे जाईल.बच्चू कडू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा देखील पराभव झाला.महायुतीने विकासाचे राजकारण करायचे ही भूमिका घेतली असेल तर मी त्यांचे स्वागत करतो. महाराष्ट्र उंचीवर आहे. त्या महाराष्ट्राला आणखी उंचीवर नेलं पाहिजे, असे देखील संभाजीराजे म्हणाले.
नवीन सरकारकडून अपेक्षा व्यक्त करताना संभाजीराजे म्हणाले, सगळ्या गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण झाला आहे ते निघालं पाहिजे. कोणत्याही धर्माचं अतिक्रमण असेल तर ते काढलच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांवर अतिक्रमण होता कामा नये. शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रण होते मात्र प्राधिकरणाच्या बैठकीमुळे मला जाता येणार नसल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये महापुरुषांच्या फोटोमध्ये राजर्षि शाहू महाराज यांचा फोटो नव्हता. त्यावर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही.शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी', असे संभाजीराजे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.