Raj-Uddhav Alliance : राज-उद्धव ठाकरेंच्या युतीला 'मनसे'तून विरोध; अभद्र, वैचारिक दारिद्र म्हणून उल्लेख!

Raj thackeray Uddhav thackeray Alliance MNS : राज-उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मनसेतील नेत्यांनी मात्र या युतीला विरोध असल्याचे संकेत दिले आहेत.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Vs MNS : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यास तयार असल्याचे म्हटले. तसा प्रस्ताव त्यांनी मुलाखतीमध्ये दिला. यावर उद्धव ठाकरेंनी देखील महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होईल, असे बोलले जात आहे.

राज-उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच मनसेतील नेत्यांनी मात्र या युतीला विरोध असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी युती म्हणजे फक्त निवडणुकीपुरती असे नाही. मराठीच्या मुद्यावर तो मराठी पक्ष एकत्र आले तर काय हरकत आहे, असे म्हटले. मात्र, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 17 हजार मनसेसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते त्यासाठी माफी मागणार का? असा सवाल केला.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
MNS Shivsena UBT alliance : मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवरून सदावर्तेंनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली; म्हणाले, "दोघांचे पक्ष गल्लीतून..."

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी तर ट्विट करत 'अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना', असे म्हणत अप्रत्यक्ष मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या युतीला विरोधच केला आहे.

'ती' वैचारिक दरिद्रता...

तू एव्हढ्या जागा लढव मी एव्हढ्या लढवतो,तू ही जागा लढव मी ही जागा लढवतो,तुला हे पद मला हे पद इतका मर्यादित विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एव्हढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी निवडणुकीपेक्षा मराठीच्या मुद्यावर एकत्र येण्यावर भर दिला.

एकनाथ शिंदे संतापले

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याबाबत प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले. त्यावर ते संतापले. ते म्हणाले असे काही विचारण्यापेक्षा काही तरी कामाचे विचारा. दरम्यान, मंत्री उदय सामंत म्हणाले की, मनसे हा राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्ष आहे. त्याने कोणासोबत पुढे जावे, कोणाला हात पुढे करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Velas Beach Accident : दोन मुलं समुद्रात बुडाली, भाचाही वाचला नाही; शेकापच्या नेत्यावर दुख:चा डोंगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com