car accident News : उद्धव ठाकरे यांच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने मोठे नुकसान

Political News : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची रविवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी येत असताना विक्रोळी महामार्गावर ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने खासदार पाटील यांच्या कारचा अपघात झाला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ऑपरेशन टायगरवरून दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप होत असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची रविवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी येत असताना विक्रोळी महामार्गावर खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. खासदार पाटील त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

रविवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार होते. रविवारी दुपारी या बैठकीला येत असताना विक्रोळी महामार्गावर खासदार संजय दीना पाटील यांच्या कारचा अपघात झाला. त्यांच्याच ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. एका गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Uddhav Thackeray
Shrikant Shinde News: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या; अपघातानंतर DCM शिंदेंचा खणाणला फोन

उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला येत असतानाच खासदार पाटील यांच्या गाडीला विक्रोळी हायवेवर अपघात झाला. यामध्ये ताफ्यातील काही गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातानंतर संजय दीना पाटील (Sanjay Patil) यांनी ठाकरेंच्या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 पैकी 9 खासदार उपस्थित होते. 9 पैकी 4 खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर 5 खासदार हे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

Uddhav Thackeray
Operation Tiger : उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची हायव्होल्टेज बैठक संपली! उपस्थित असलेल्यांची यादीच आली समोर; 'त्या' पाच जणांशी फोनद्वारे चर्चा

अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय जाधव हे सर्व खासदार या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती खासदार राऊत यांनी या बैठकींनंतर दिली आहे.

Uddhav Thackeray
Shrikant Shinde News: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या; अपघातानंतर DCM शिंदेंचा खणाणला फोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com