Shrikant Shinde News: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या; अपघातानंतर DCM शिंदेंचा खणाणला फोन

Shivsena Marathwada Shivsanwad Yatra : खासदार श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यातील तीन जिल्हे आणि तेवीस विधानसभा मतदारसंघातील शिवसंवाद दौरा कालपासून सुरू झाला. जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यात ते पदाधिकारी, शिवसैनिक आणि त्या त्या भागातील व्यापारी, उद्योजक, डाॅक्टर व इतर तज्ञांशी संवाद साधत आहेत.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यात 'शिवसंवाद' दौऱ्यासाठी जात असताना शिंदे यांच्या गाड्याच्या ताफ्यासमोर अचानक एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचनाक ब्रेक दाबला. मागून येणाऱ्या गाड्या वेगात येत असल्याने चार गाड्या एकमेकांना धडकल्या. या विचित्र अपघातात गाड्यांचे मोठे नूकसान झाले असले तरी सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोणाला काही लागले आहे का? अशी विचारणा करतानाच दौऱ्यात काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. याच वेळी एसआयआर च्या अनुषंगाने जिल्ह्यात किती बीएलएची नियुक्ती केली, असेही शिंदे यांनी आमदार बाबुराव कदम यांना विचारले.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यातील तीन जिल्हे आणि तेवीस विधानसभा मतदारसंघातील शिवसंवाद दौरा कालपासून सुरू झाला. जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यात ते पदाधिकारी, शिवसैनिक आणि त्या त्या भागातील व्यापारी, उद्योजक, डाॅक्टर व इतर तज्ञांशी संवाद साधत आहेत. आज शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व स्थानिक नेत्यांसह नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते.

सकाळी 11 वाजता नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात शिंदे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना समोरच्या गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकावर आदळल्या. या अपघातात काही गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Shrikant Shinde
Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा मराठवाडा दौरा, स्वबळाच्या चाचपणीसाठी? जालना जिल्हा परिषदेत प्रत्येक सर्कलमध्ये तयार राहण्याचे आदेश!

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. नायगाव येथील बैठकीला जात असताना हा अपघात घडला. नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतल्यातर श्रीकांत शिंदे नायगाव येथे बिलोली, देगलूर आणि मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीसाठी निघाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com