Sanjay Lathkar : मराठवाड्याच्या भूमिपुत्राला केंद्रात मोठी जबाबदारी; अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी संजय लाठकर

Sanjay Lathkar has appointed As DG in the Department of Atomic Energy: लातूरचे माजी पोलिस अधीक्षक संजय आनंदराव लाठकर यांची अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली असून, देशातील अणुऊर्जा केंद्रांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Sanjay Lathkar has  appointed As DG in the Department of Atomic Energy
Sanjay Lathkar has appointed As DG in the Department of Atomic EnergySarkarnama
Published on
Updated on

Sanjay Lathkar : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदी लातूरचे माजी पोलिस अधीक्षक आणि नांदेडचे रहिवासी संजय आनंदराव लाठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील अणुऊर्जा केंद्रे, संबंधित संस्थांसह किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्याच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी आता लाठकर यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मराठवाड्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

लाठकर यांच्या अखत्यारीत देशभरातील ५० पेक्षा अधिक अणुऊर्जा केंद्रे व संबंधित संस्थांच्या सुरक्षेचे व्यवस्थापन तसेच युरेनियमसारख्या किरणोत्सारी पदार्थांच्या साठ्यांच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदाऱ्या असतील. मराठवाड्यातील अधिकाऱ्याला प्रथमच या पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.

संजय लाठकरांची कारकिर्द

संजय लाठकर हे १९९५च्या तुकडीचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी लातूर आणि परभणीचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर पुण्यात अप्पर पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) पोलिस उपमहानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

गडचिरोली, मुंबई तसेच झारखंडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) उपमहानिरीक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. कर्नाटक, हैदराबाद, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सीआरपीएफच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

Sanjay Lathkar has  appointed As DG in the Department of Atomic Energy
Maharashtra Political Live Update: 'गणेशोत्सवाला कुठलेही विघ्न येऊ नये,एवढीच आमची अपेक्षा...'; मुख्यमंत्री फडणवीस

राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पदके

लाठकर यांच्या सेवाकाळातील कामगिरीची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रपतींची तीन आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची तीन पदके मिळाली आहेत. याशिवाय महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांना एकूण ११ पदके मिळाली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या तंटामुक्त गाव मोहिमेसह अल्पसंख्याक विभागाशी संबंधित कामासाठी राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांना एकूण अकरा पदके आणि तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

Sanjay Lathkar has  appointed As DG in the Department of Atomic Energy
Maharashtra News Update : देश-विदेशात दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

आता अणुऊर्जा विभागाच्या महासंचालकपदाची जबाबदारी घेताना लाठकर यांच्यासमोर देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या सुरक्षा व्यवस्थेचा भार असणार आहे. मराठवाड्यातील अधिकाऱ्याला पहिल्यांदाच मिळालेली ही जबाबदारी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com