Sanjay Raut Video : 'तू दलाल...माझ्या नादाला लागू नको नाहीतर नागडा करीन', संजय राऊत 'या' खासदारावर संतापले; नको नको ते बोलले

Sanjay Raut Criticized Praful Patel : ते कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाप बाप करत फिरत होते. दाऊद इब्राहिमची दलाली करत होते, अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे? अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : वक्फ बोर्ड विधेयक राज्यसभेत मंजुर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार टोले लगावले. संजय राऊत यांना देखील त्यांनी सभागृहात आव्हान दिले. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया आज (गुरुवार) माध्यमांशी बोलताना दिली.

संजय राऊत म्हणाले, 'प्रफुल पटेल संसदेत आहेत त्याची लाज वाटते. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात. रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. प्रफुल पटेल सारख्या माणसाला घेऊन अजित पवारांनी स्वतः अवमुल्यन करून घेतलय. प्रफुल पटेल सारखे लोक कोणाचे नाहीत ते दलाल आहेत.'

Sanjay Raut
Deenanath Mangeshkar Hospital Live: उपचाराआधीच 10 लाख मागणाऱ्या 'दीनानाथ' च्या डॉक्टरांवर शिवसैनिकांनी चिल्लर फेकली!

'मी प्रफुल पटेलला सांगतो माझ्या नादाला लागू नको नागडा करीन.तिथे भाजपच्या लोकांना चमकोगीरी करून दाखवत होता. अशा दळभद्रांच्या तोंडाला लागण हा महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रफुल पटेल यांनी नमस्कार केला की आम्ही नमस्कार करतो. पण काल हा आकाशातून निष्ठेचा मृर्तीमंत पुतळा पडलाय खाली, फार मोठा राष्ट्रभक्त आहे,असे बोलत होता. प्रफुल पटेल संसदेत आहेत त्याची लाज वाटते.', असे देखील संजय राऊत म्हणाले.

'ते कधी काँग्रेस पक्षाची दलाली करत होते. कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाप बाप करत फिरत होते. दाऊद इब्राहिमची दलाली करत होते, अशा लोकांची संसदेत उभं राहून बोलण्याची लायकी आहे? आम्ही रंग बदलत नाही. आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहोत. तुम्ही पहा तुमचा कोणता रंग आहे. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे.', असा टोलाही राऊत यांनी पटेलांना लगावला.

...तर महाराष्ट्र सोडून जावं लागेल

'मी जर सगळा इतिहास काढला तर त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागलं. हे लोकं देवेंद्र फडणवीस यांच्या बाजुला बसणार. हे कायम वाकलेली लोक यांना पाठीचा कणा नाही. हे लोकं संसेदत आमच्या महाराष्ट्राचे नेतृत्व करतायेत हे भंपक लोकं आहेत.', असा हल्लाबोल देखील प्रफुल पटेलांवर संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut
Kolhapur Police crime : रक्षकच बनला भक्षक! जबाब घ्यायला गेलेल्या पोलिसाने पीडित मुलीची छेड काढली; कोल्हापुरातील संतापजनक घटना

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com