Maharashtra Politics : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे, शासनाच्या या निर्णयानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली. याविषयी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी आता राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राऊत म्हणाले, हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी मोठी पोस्ट केली होती. इतक्या लवकर इतकी मोठी पोस्ट कशी काय केली गेली? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रीप्ट सागर बंगल्यावर लिहली गेली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. मनसेचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत असा प्रश्न पत्रकारांनी केला असता संजय राऊत म्हणाले... ते कुठून तरी आलेलं स्क्रीप्ट वाचू नका, तुम्ही कधी हिंदू झालात? कधी मराठी असता कधी हिंदू असता कधी बिंदू असता कधी सिंधू असता काय ते ठरवा, ते सुधाकरासारखं एकाच पेलामधील बोलू नका अशी खिल्ली संजय राऊत यांनी उडवली. किती वेळा कपडे बदलणार असाही सवाल संजय राऊत यांनी केला.
तसेच यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला. मोदी आणि अमित शहा यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचे संजय राऊत म्हणाले. हिंदी आमच्यावर लादू नका, आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करा, त्याची हिंमत आहे का? मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही. ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो. तेथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही. अजूनही राज्यात अनेक ठिकाणी मराठी भाषा सक्तीची झाली नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या निर्मितीत भाजपचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळे आमच्यावर हिंदी लादू नका, सक्ती करु नका. हिंदी ही देशातील संवादात्मक भाषा आहे. तिला आमचा विरोध नाही. मात्र, आधी नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या ठिकाणी मराठी भाषेचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहीजे. तेथे आधी मराठी सक्तीची करा असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.