
Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी थेट राजकीय संन्यास घेण्याचा विचार असल्याचे बोलून दाखवले. तसेच पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी नाराज असा संदेश देण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न असतो, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. जाधव यांच्या या वक्तव्यानंतर राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधव हाडाचे, कडवट, आक्रमक शिवसैनिक आहेत. ते छान बोलतात, छान लढतात. त्यांच्या मनात काय आहे? काय वेदना आहेत ते आम्ही नक्की समजून घेऊ ते आमचेच आहेत. ते मुंबईला आल्यावर उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याशी बोलतील.
'शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचे योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत त्यांचे जे भूमिका आहे ते मी वृत्तपत्रात वाचली. बराच काळ ते त्यांच्या मतदारसंघात आणि कोकणामध्ये असतात त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवल्या.', अशा शब्दांत राऊत यांनी भास्कर जाधवांचे कौतुक केले.
आमदार फूटून जावे असे कोणाला वाटत नाही. शरद पवारांचे ते उदाहरण देत आहेत ते बरोबर आहे. पण तरीही त्यानंतर अडीच वर्षांनी अजित पवार 40 ते 42 आमदार घेऊन गेले. त्यांना शेण खायचाच आहे त्यांनी स्वतःच्या तोंडात शेण भरलं आहे. गद्दारीचे ते थांबणार नाही पैसा आणि सत्तेची चटक त्यांना लागली आणि ज्यांच्यावर दबाव आहे ईडी सीबीआय पोलीस तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही.
भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी नाराज नाही. शिवसेनेत माझी कुठलीही घुसमट नाही. शरद पवारांना सोडून चूक केली असे मी म्हणतो याचा अर्थ माझा प्रमाणितपणा आहे. त्यात माझी शिवसेनेत घुसमट होते असा नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.