Sanjay Raut Video : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट; संजय राऊत म्हणाले, 'पाठीत खंजीर...'

Sanjay Raut on Ajit Pawar Sharad Pawar Meeting : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar | Sharad Pawar | Sanjay Raut
Ajit Pawar | Sharad Pawar | Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवारी) शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे देखील होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले. या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, 'यांची हिम्मत कशी होते. हे निर्ढावलेले लोक आहेत. आम्ही वडिलधाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असता तर आमची हिंमत झाली नसती भेटण्याची, डोळ्यात डोळे घालण्याची. मी माझं मत सांगतोय. महाराष्ट्रातील जनतेला ते पटलेच असे नाही.'

Ajit Pawar | Sharad Pawar | Sanjay Raut
Privilege Motion : विरोधकांची लायकी काढणारे केंद्रीय मंत्री अडचणीत? राज्यसभेत महत्वाचा प्रस्ताव

'आत्ता जे लोकं त्यांना (शरद पवार) सोडून गेले. त्यांच्यावरती टीकाटीपण्णी केली ते लोक शुभेच्छा देण्यासाठी आले असतील शुभेच्छा घेतील ते', असे देखील राऊत म्हणाले. तसेच आम्ही शिवसेनेचे खासदार, काँग्रेसचे खासदार देखील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. ते महाराष्ट्राचा आधारवड आहेत. त्यांच्या दीर्घआयुष्याची प्रार्थना आम्ही करत असतो.

अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यासोबत मुलगा पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी नेते त्यांच्यासोबत होते.

अमित शाह शरद पवारांच्या भेटीला

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची विविध नेत्यांनी भेट घेतली. गृहमंत्री अमित शाह हे देखील शरद पवारांची भेट घेतली. अमित शाह यांनी शरद पवारांच्या भेटीवर बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, शरद पवार जर महायुतीमध्ये आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू.

Ajit Pawar | Sharad Pawar | Sanjay Raut
Supreme Court : मंदिर-मशिदीसंदर्भात ‘सुप्रीम’ आदेश; नवीन खटला दाखल करण्यास मनाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com